शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत फोडफोडी जोरात, काँग्रेसच्या कृष्णा तिरथ भाजपात

By admin | Updated: January 19, 2015 14:41 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तिरथ यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. किरण बेदी, शाझिया इल्मी आणि आता कृष्णा तिरथ यांना पक्षात घेऊन भाजपाने केजरीवालांविरोधात महिला आर्मी मैदानात उतरवल्याचे दिसते. 
कृष्णा तिरथ यांनी युपीएच्या कार्यकाळात महिला व बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून काम केले होते. सोमवारी सकाळी त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली व त्यांनंतर भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.  'मी कार्यकर्ता म्हणून पक्षात आले असून माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय भाजपा नेतृत्व घेईल' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  कृष्णा तिरथ या दलित नेत्या असून दिल्लीतील दलित व्होटबँकेवर नजर ठेवून त्यांचा प्रवेश हा भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.  गेल्या विधानसभा निवडणुकीत १२ आरक्षित मतदारसंघापैकी आम आदमी पक्षाला तब्बल नऊ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपाला दोन आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला होता. कृष्णा तिरथ यांच्या मदतीने आपकडे जाणारे दलित मतदार भाजपाकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठींनी केला आहे. तिरथ यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली जाईल अशी चर्चा आहे.