शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:11 IST

दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी  कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुढे आलेल्या व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलमध्ये सामील झालेल्या डॉक्टरांचे कट्टरपंथीकरण २०१९ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सुरू झाले, अशी माहिती समोर आली आहे. तपासात सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितले, उच्च शिक्षित व्यावसायिकांना पाकिस्तान व जगाच्या इतर भागांमध्ये असलेल्या दहशतवादी सूत्रधारांकडून दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात आहे. तेही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून तयार केले जात आहे.

सूत्रांनी सांगितले की, दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य, ज्यात डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. आदिल राथेर, डॉ. मुझफ्फर राथेर आणि डॉ. उमर-उन-नबी यांचा समावेश आहे. सुरुवातीला सीमेपलीकडून त्यांच्या हँडलर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे आढळले. या व्यक्तींना ताबडतोब टेलिग्रामवरील ग्रुपमध्ये जोडले गेले. जिथे त्यांचे कट्टरपंथीकरण करण्यात आले. त्यानंतर दहशतवादी मॉड्युलच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ले करण्यासाठी आईडी  कशी बनवायची, हे शिकण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

भारतात कोणताही मुस्लीम  कुलगुरू होऊ शकत नाही
जमियत उलेमा-ए-हिंद (एएम) प्रमुख अर्शद मदानी यांनी दिल्ली बॉम्बस्फोटांशी जोडलेल्या अल-फलाह विद्यापीठाचा उल्लेख करून मुस्लिमांविरुद्ध भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. मदानी यांनी दावा केला की जोहरान ममदानी न्यू यॉर्कचे महापौर म्हणून निवडले जाऊ शकतात, तर खान लंडनचे महापौर म्हणून निवडले जाऊ शकतात, परंतु भारतात कोणताही मुस्लीम विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकत नाही. मदनी म्हणाले, "आणि जर कोणी असे केले तर त्यांना आझम खान सारखे तुरुंगात पाठवले जाईल. भाजप नेत्यांनी यावर मदनीवर टीका केली. तसेच दिल्ली बॉम्बस्फोटांच्या तपासाला जातीय रंग देत असल्याचाही आरोप केला.

अटकेतील मौलवीला डॉक्टरकडून हवे सहा महिन्यांचे थकीत भाडे 
हरियाणाच्या मेवात येथील मौलवी इश्तियाक याचे अल फलाह विद्यापीठाजवळ घर आहे. त्याने दिलेल्या भाड्याच्या खोलीतून अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट व सल्फरसह २,५०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान मौलवी इश्तयाकने सांगितले की, गनई व उमरने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याशी संपर्क साधला. त्याच्या घरी खतांसारख्या काही वस्तू ठेवण्यासाठी विचारणा केली होती. त्याच्या बदल्यात २,५०० रुपये महिना भाडे देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तेथे नेमके काय ठेवले जाणार आहे, याची इश्तियाकला कल्पना नव्हती. सहा महिन्यांपासून त्याचे भाडे थकीत आहे, तेवढे मिळवून द्या. चौकशीदरम्यान गनईने इश्तियाकच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctors' brainwashing on social media since 2019: Terror module exposed.

Web Summary : Doctors linked to a terror module were radicalized via social media since 2019. Pakistan-based handlers used digital platforms to recruit professionals. The module members learned to create IDs for attacks online. A cleric claims unpaid rent from a doctor linked to explosives.
टॅग्स :Blastस्फोटdelhiदिल्लीterroristदहशतवादी