माणिकचंद लोढा यांचे संथारा व्रतानंतर देहदान

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:24+5:302015-08-16T23:44:24+5:30

पुणे : संथारा व्रत घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकचंद धोंडीराम लोढा (वय ९१) यांचे रविवारी नेत्रदान करण्यात आले. ससूण रुग्णालयात उद्या (सोमवारी) सकाळी १० वाजता देहदान करण्यात येणार आहे. लोढा यांनी तब्बल सात वर्षांपूर्वी लिहलेल्या मृत्यूपत्रात मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचा विधी करू नये, दु:खी होवू नये, पण माझे देहदान करावे, असे म्हटले होते. त्यानुसार लोढा कुटुंबियांनी कोणताही विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dehradan after the death of Manikchand Lodha | माणिकचंद लोढा यांचे संथारा व्रतानंतर देहदान

माणिकचंद लोढा यांचे संथारा व्रतानंतर देहदान

णे : संथारा व्रत घेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकचंद धोंडीराम लोढा (वय ९१) यांचे रविवारी नेत्रदान करण्यात आले. ससूण रुग्णालयात उद्या (सोमवारी) सकाळी १० वाजता देहदान करण्यात येणार आहे. लोढा यांनी तब्बल सात वर्षांपूर्वी लिहलेल्या मृत्यूपत्रात मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचा विधी करू नये, दु:खी होवू नये, पण माझे देहदान करावे, असे म्हटले होते. त्यानुसार लोढा कुटुंबियांनी कोणताही विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
माणिकचंद लोढा मूळचे बीडचे होते. व्यावसायानिमित्त ते पुण्यात आले होते. कर्वेनगर येथे निवासस्थानी संथरा व्रताच्या सातव्या दिवशी त्यांनी देह त्याग केला. त्याच्यामागे डॉ. सुमतीलाल लोढा, शरद लोढा व रमेश लोढा असे तीन मुलगे, सूना व नातवंडे असा परिवार आहे.
--------------
फोटो : हणमंत लॉगीनमध्ये लोढा नावाने सेव्ह
---------------

Web Title: Dehradan after the death of Manikchand Lodha