शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले

By admin | Updated: January 14, 2015 02:08 IST

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़

लखनौ : पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ‘छुप्या युद्धाला’ भारत कठोरपणे उत्तर देईल, अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकला ठणकावले आहे़ देशाच्या सीमेवर घुसखोरी होऊ नये, यासाठी सरकार ठोस पावले उचलेल़ मी याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले़ मंगळवारी येथे पत्रकारांशी ते बोलत होते़ पाकिस्तानकडून सुरू असलेल्या छुप्या कारवायांवर भारत सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे़ आम्ही एक ठोस भूमिका घेतली आहे़ याठिकाणी ही भूमिका, मी स्पष्ट करू शकणार नाही; पण येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष आकड्यांमध्ये बदल झालेला असेल़ खरे तर फरक आताही दिसतो आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६५ ते ७० टक्के अधिक अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ शेजारी देशांसोबत भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण सीमेपलीकडून छुप्या युद्धाचे प्रयत्न झाल्यास आम्हीही कठोर पावले उचलू, असे संरक्षणमंत्री म्हणाले़पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग आणि घुसखोरी थांबवावी, तरच चर्चा शक्य आहे़ पाकिस्तान हे करणार नसेल तर चर्चेतून काहीही साध्य होणार नाही़गुजरातेतील पोरबंदरच्या खोल समुद्रात भारतीय तटरक्षक दलाकडून पाठलाग सुरू असतानाच, स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या संशयित पाकिस्तानी नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याच्या बयाणाबाबत विचारले असता, पर्रीकर यांनी आपण असे म्हटलेच नसल्याचे सांगितले़ ते म्हणाले की, नौकेतील कथित अतिरेक्यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे मी म्हटलेच नाही़मी केवळ एवढेच म्हटले की, आत्मघातासाठी नौकेवरील दहशतवादी कुठलीही पद्धत स्वीकारू शकतात़ (वृत्तसंस्था)