शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडग्रस्त मुलीचा मृत्यू ही तर देवाची इच्छा - पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांची मुक्ताफळे

By admin | Updated: May 2, 2015 19:06 IST

धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आल्यानंतर मुलगी मृत्युमुखी पडल्याची घटना म्हणजे देवाची इच्छा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनी केले.

ऑनलाइन लोकमत
मोगा ( पंजाब), दि. २ - धावत्या बसमधून छेड काढल्यानंतर फेकून देण्यात आल्यानंतर मुलगी मृत्युमुखी पडल्याप्रकरणी सर्व स्तरातून न्यायाची मागणी होत असतानाच 'ही घटना म्हणजे देवाची इच्छा' असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पंजाबचे शिक्षणमंत्री सुरजीत सिंह रखरा यांनी केले आहे. रखरा यांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. या घटनेवरून पंजाबमधील बादल सरकारवर टीका होत असतानाच रखरा यांनी ' कोणीही अपघात थांबवू शकत नाही, जे काही होतं ते देवाच्या इच्छेने होत असतं. भविष्यात आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करू ' असे म्हटले आहे. रखरा यांच्या अशा असंवेदनशील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 
पंजाबमध्ये बुधवारी सायंकाळी ( २९ एप्रिल) मायलेकीला धावत्या बसमध्ये छेडछाड करून नंतर खाली ढकलून देण्यात आल्याची संतप्त घटना  घडली होती. यात पीडित तरुणीला आपला जीव गमवावा लागला तर तिची आई जबर जखमी झाली.  मोगापासून १० किमी अंतरावर गिल गावाजवळ झालेल्या या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेसह संपूर्ण देशात उमटले. ही बस पंजाबमधील सत्ताधारी बादल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असल्यामुळे विरोधी पक्षांनी निषेधाचे स्वर उंचावले. तर  पुरेशी नुकसानभरपाई मिळेपर्यंत आणि संबंधित बस कंपनीचा परवाना रद्द करेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबाने घेतला आहे.