शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

दाऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!

दाऊद आणि हाफिजला भारताच्या स्वाधीन करा!
भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली : पाकिस्तान जर दहशतवादाविरुद्ध लढण्यात खरोखरच गंभीर असेल तर या शेजारी राष्ट्राने मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी हाफिज सईद आणि देशाचा मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम या दोघांना भारताच्या स्वाधीन करावे, असे आवाहन संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केले आहे.
पेशावर येथील सैनिक शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा पाकिस्तानने फायदा घ्यावा आणि दहशतवादाचा बीमोड करण्याच्या दिशेने कठोर पाऊल उचलावे. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात लढण्यात खरोखरच गंभीर असेल तर त्याने आधी हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम या दोघांना अटक करून भारताच्या स्वाधीन केले पाहिजे. नवाज शरीफ या संधीचा फायदा घेतील आणि दहशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलतील, अशी आशा आहे, असे नायडू म्हणाले. संसदेबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. हाफिज हा जगातील दहशतवादाचा मुख्य प्रवर्तक आहे. तो मानवतेचा शत्रू आहे, असेही नायडू म्हणाले.
लखवीच्या जामिनाला विरोध
२००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकिऊर रहमान लखवी याला मिळालेल्या जामिनाचा विरोध करण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानमधील आपल्या उच्चायुक्त कार्यालयाच्या संपर्कात आहे.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे आणि हल्लेखोरांना मदत पुरविण्याचा आरोप असलेल्या सात जणांना पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. या सात जणांमध्ये लखवी हा एक आहे. त्याला जामीन मिळाल्यानंतर लगेच भारताने इस्लामाबादेतील आपल्या दूतावासाशी संपर्क साधून या जामिनाला जोरदार विरोध करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लखवी आणि अन्य सहा जणांनी बुधवारी जामीन अर्ज दाखल केला होता. फेडरल इन्व्हेस्टीगेशन एजंसीने त्यांना जामीन देण्यास विरोध केला. मात्र लखवीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या सर्वांचा जामीन मंजूर केला. (वृत्तसंस्था)