दर्डा प्रश्न-१ कुतूबमीनार कलतोय, पण... विजय दर्डा यांना सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेली माहिती

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:11+5:302016-03-03T01:57:11+5:30

नवी दिल्ली : दिल्लीचा प्रसिद्ध कुतूबमीनार हळूहळू आपल्या पायव्यापासून कलतो आहे. परंतु मीनारचे हे कलणे फारच किरकोळ स्वरूपाचे आहे, असे सरकारला वाटते. असे असले तरी कुतूबमीनारच्या पायव्यापर्यंत पाणी झिरपणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.

Darda Question-1 Kutubminar is a bit curious, but ... information given by the Minister of Culture to Vijay Darda | दर्डा प्रश्न-१ कुतूबमीनार कलतोय, पण... विजय दर्डा यांना सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेली माहिती

दर्डा प्रश्न-१ कुतूबमीनार कलतोय, पण... विजय दर्डा यांना सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेली माहिती

ी दिल्ली : दिल्लीचा प्रसिद्ध कुतूबमीनार हळूहळू आपल्या पायव्यापासून कलतो आहे. परंतु मीनारचे हे कलणे फारच किरकोळ स्वरूपाचे आहे, असे सरकारला वाटते. असे असले तरी कुतूबमीनारच्या पायव्यापर्यंत पाणी झिरपणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.
सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. महेश शर्मा यांनी बुधवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. डेहराडून येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, कुतूबमीनार आपल्या पायव्याच्या तुलनेत दरवर्षी सरासरी ३.५ सेकंद दराने कलतो आहे, जे नगण्य आहे. तरीदेखील मीनारचा पाया मजबूत राहावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असे शर्मा यांनी सांगितले.
हिंदू-जैन प्रतिमा सापडल्या
कुतूबमीनार शेजारी संरक्षण आणि वैज्ञानिक साफसफाई दरम्यान हिंदू आणि जैन मंदिरांचे काही वास्तुशिल्पीय अवशेष सापडले होते. त्यातील काही अवशेष कुतूब परिसरात प्रदर्शित करण्यात आले आहेत तर उर्वरित प्रतिमांना त्याच परिसरात संरक्षित करण्यात आले आहे, असे शर्मा यांनी खा. विजय दर्डा यांना सांगितले.
कुतूबमीनार परिसरात कोणतेही उत्खनन करण्यात आलेले नाही, केवळ वैज्ञानिक साफसफाई तेवढी करण्यात आली, असा दावाही शर्मा यांनी यावेळी केला.
समीक्षा समिती नाही
सरकारने मुलकी-लष्करी संबंधांची समीक्षा करण्यासाठी कोणतीही विशेषज्ज्ञ समिती गठित केलेली नाही, अशी माहिती खा. दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Darda Question-1 Kutubminar is a bit curious, but ... information given by the Minister of Culture to Vijay Darda