शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आदिलाबाद-अकोला पॅसेंजरवर दरोडा

By admin | Updated: August 18, 2014 02:46 IST

दरोडेखोरांच्या टोळीने १६ आॅगस्टच्या मध्यरात्री आदिलाबाद-अकोला पॅसेंजरमध्ये धूमाकुळ घातला. दरोडेखोरांच्या मारहाणीत सुमारे २0 प्रवासी जखमी झाले. पाोलिसांनी अवघ्या काही तासांत चौघांना अटक केली.

हिंगोली : दरोडेखोरांच्या टोळीने १६ आॅगस्टच्या मध्यरात्री आदिलाबाद-अकोला पॅसेंजरमध्ये धूमाकुळ घातला. दरोडेखोरांच्या मारहाणीत सुमारे २0 प्रवासी जखमी झाले. पाोलिसांनी अवघ्या काही तासांत चौघांना अटक केली.पुरुष प्रवाशांवर चाकुने वार करत दरोडेखोरांनी महिलांकडील दागिने तसेच पुरूषांजवळील रोख रक्कम, मोबाईल व अंगठ्या अशा मौल्यवान वस्तू जबरीने काढून घेतल्या. पॅसेंजर गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची व्यवस्था नसते. त्यामुळे प्रवाशांना मदतीचा कोणताही पर्याय उपलब्ध झाला नाही. नांदापूर रेल्वेस्थानकाजवळ गाडीचा वेग कमी होताच दरोडेखोर गाडीखाली उड्या घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाले. आदिलाबादहून अकोल्याकडे जाणारी पॅसेंजर पूर्णा स्थानकावरून शनिवारी रात्री १०.१० वाजता सुटल्यानंतर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा स्थानकाजवळ २० ते २५ वर्षे वयोगटातील ६ तरुणांचे टोळके गाडीत शिरले होते. पाठीमागून तिसऱ्या डब्यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी हेरले. त्यांनी धारदार चाकू व कटरचा धाक दाखवत धूमाकुळ घातला. दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरूषाच्या हातावर, मांडीवर आणि पोटावर त्यांनी चाकुने वार केले. साखळी ओढून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाच्या हातावरही त्यांनी वार केले. जखमी प्रवाशांना तातडीने हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)