शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

कोरोनापाठोपाठ भारतात लवकरच धडकणार दुसरं मोठं संकट; मोदींनी बोलावली तात्काळ बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 1:27 PM

भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली

ठळक मुद्देभारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं 12 तासांत सुपर चक्रीवादळात रुपांतरण होईल.ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवी दिल्लीः भारताच्या किनारपट्टीला लवकरच अम्फान हे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती मिळाली असून, हे वादळ विक्राळ रूप धारण करणार असल्याचंही हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्ली हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, अम्फान या वादळाचं 12 तासांत सुपर चक्रीवादळात रुपांतरण होईल. ते आता उत्तर-ईशान्यच्या दिशेने सरकत असून, 20 मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी ते दिघा / हटिया बेट पार करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी त्याची गती 155-165 ताशी किमी असू शकते आणि तीव्र असल्यास ती 185 ताशी किमी असू शकते. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ बैठक बोलावली आहे.चक्रीवादळ 'अम्फान' सोमवारी भयंकर स्वरुप धारण करणार असून, ओडिशाच्या किनारपट्टी भागात जोरदार वा-यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या इशा-यानंतर राज्य सरकारने या भागातून 11 लाख लोकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी 13 किलोमीटर वेगाने प्रवास करणारे 'अम्फान' 12 तासांत वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल. जोरदार वाऱ्यामुळे कच्च्या घरांचे बरेच नुकसान होणार असून, 'पक्के' घरांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.वा-याच्या जोरदार वेगामुळे वीज व दळणवळणाचे खांब वाकणे किंवा विस्कळीत होणे, रेल्वे सेवा काही प्रमाणात विस्कळीत होऊ शकते आणि वीज केबल्स व सिग्नल यंत्रणा तुटल्या जाऊ शकतात. तसेच या वादळाचा पिके आणि बागांवर परिणाम होऊ शकतो. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. भुवनेश्वरच्या हवामान केंद्राचे संचालक एचआर बिस्वास यांनी सांगितले की, अम्फान केंद्र ओडिशाच्या पारादीपच्या 790 किलोमीटर दक्षिणेकडे, पश्चिम बंगालमधील दिघाच्या 940 किलोमीटर  दक्षिण-नैऋत्येकडे आणि बांगलादेशातील खेपुपारापासून 1060 किलोमीटर दक्षिण- पश्चिमेकडे असेल.  हे चक्रीवादळ वायव्य बंगालच्या उपसागराशेजारील उत्तर-ईशान्य दिशेकडे जाईल आणि २० मे रोजी दुपारी किंवा संध्याकाळी बांग्लादेशातील हटिया बेट आणि पश्चिम बंगालमधील दिघा दरम्यान पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीवर जोरदार धडकेल. यावेळी  155-165 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, जे कधीही 185 किमी प्रतितास वेग पकडू शकतील.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: ...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार

Coronavirus: चीनविरोधात जगातील ६२ देशांनी आखला ‘चक्रव्यूह’; कोरोनाला जबाबदार आढळल्यास...

Lockdown 4.0: जाणून घ्या, तुमच्या विभागात दुचाकी, ऑटो, बस, टॅक्सी सेवा सुरु होणार? वाचा नियम!

इस्राइलमधील राजकीय अनिश्चितता संपुष्टात, नेतान्याहू पुन्हा पंतप्रधानपदी, मोदींनी दिल्या शुभेच्छा

टॅग्स :cycloneचक्रीवादळcorona virusकोरोना वायरस बातम्याCyclone Amphanअम्फान चक्रीवादळ