सहारनपूरची संचारबंदी काही तासांसाठी शिथिल

By Admin | Updated: July 29, 2014 23:45 IST2014-07-29T23:45:09+5:302014-07-29T23:45:09+5:30

हिंसाचारप्रभावित सहारनपूरमधील स्थिती नियंत्रणात येताच जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी येथील संचारबंदी काही तासांसाठी शिथिल केली़

The curfew in Saharanpur is relaxed for a few hours | सहारनपूरची संचारबंदी काही तासांसाठी शिथिल

सहारनपूरची संचारबंदी काही तासांसाठी शिथिल

सहारनपूर : हिंसाचारप्रभावित सहारनपूरमधील स्थिती नियंत्रणात येताच जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी येथील संचारबंदी काही तासांसाठी शिथिल केली़ जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी सांगितले की, स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आह़े यामुळे लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता यावे म्हणून नवा शहर भागात आज सकाळी 1क् ते दुपारी 2 वाजेर्पयत तर जुना शहर भागात दुपारी 3 ते संध्याकाळी 7 र्पयत  संचारबंदी शिथिल करण्यात आली़
दरम्यान, सहारनपूरमधील स्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)
 
4सहारनपूर दंगलीच्या पाश्र्वभूमीवर ‘गुजरात मॉडेल’ची री ओढणारे कथितरीत्या प्रक्षोभक टि¦ट करून  भाजपा आमदार सी़टी़ रवी  यांनी नवा वाद ओढवून घेतला आह़े तथापि हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच त्यांनी घूमजाव केल़े
4 सांप्रदायिक तत्त्वांना रोखण्यासाठी सन 2क्क्2 पासून गुजरात सरकारने राबविलेले ‘गुजरात मॉडेल’च प्रभावी ठरल़े हे मॉडेल संपूर्ण देशात राबवा, असे टि¦ट रवी यांनी केले होत़े तत्कालीन (नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील) गुजरात सरकारने 2क् हजारांपेक्षा अधिक लोकांना अटक केली होती.
 
 

 

Web Title: The curfew in Saharanpur is relaxed for a few hours