शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती बिकट सखल भागात नुकसान : भिज पावसाने ओलावा एक मीटरपर्यंत

By admin | Updated: July 12, 2016 00:10 IST

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.

जळगाव : मागील ३६ तासांपासून सुरू असलेल्या भिज पावसामुळे पाण्याचा निचरा फारसा न होणार्‍या काळ्या कसदार जमिनीच्या भागात पिके पिवळे पडत आहेत. कपाशीमध्ये अतिपाण्यामुळे मर रोग येत असून, आणखी २४ तास अशीच स्थिती राहिली तर पिकांना याचा फटका बसेल.

३ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. जवळपास सहा दिवस पिकांची मशागत करण्यासह खते देणे, तण नियंत्रण अशा कामांमध्ये शेतकरी व्यस्त होते. त्यात शनिवारी रात्रीपासून सततचा भिज पाऊस सुरू झाला. अनेक भागातील पिकांसाठी म्हणजेच पाण्याचा निचरा होणार्‍या, उताराच्या जमिनीवरी पिकांना या पावसाचा लाभ होत आहे. परंतु काळ्या कसदार, पाणी तुंबणार्‍या जमिनीत पिके पिवळी पडत आहेत.

तापी काठावरील भागामध्ये ही समस्या अधिक आहे. परंतु इतरत्र मात्र पिके तरारत आहेत. जिल्ह्यात पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित पेरण्या सततच्या पावसामुळे वाफसा नसल्याने थांबवाव्या लागल्या आहेत.
केळी, ऊस, मका, सोयाबीनला लाभ
सध्याचा भिज पाऊस केळी, ऊस, सोयाबीन, मका या पिकांना लाभदायी आहे. केळीमध्ये भर पावसात खते देण्याचे काम काही भागात हाती घेण्यात आल्याचे दिसून आले.

सखल भागात समस्या
यातच शेतांमधील सखल भागात मागील काळा तुंबलेले पाणी अद्यापपर्यंत जिरले नव्हते. अशा शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने या सखल भागात पाणी पुन्हा साचू लागले आहे.

कपाशी, सोयाबीन, कडधान्य लागवडीची मुदत संपली
आतापर्यंत जिल्हाभरात ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा आठ लाख ४२ हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होईल, असे उद्दीष्ट होते. अजून जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व्हायची राहीली आहे. अनेक शेतकरी पेरणीसाठी वाफसा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु आता कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके लागवड करण्याची किंवा पेरणीची मुदत संपली आहे. तूर, बाजरी ही पिके पेरावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

नुकसान नाही- कृषि विभाग
हा भिज पाऊस पेरणी झालेल्या पिकांसाठी लाभदायी आहे. फक्त तण नियंत्रण व आंतरमशागतीची कामे खोळंबतील. परंतु पिके खराब होतील, अशी स्थिती नाही. कुठेही नुकसानाची माहिती आलेली नाही. काळ्या जमिनीमध्येही भिज पावसाने नुकसान होत नाही, असा दावा केला.