राव यांच्या विरुद्ध आंध्र प्रदेशात गुन्हा

By Admin | Updated: June 9, 2015 00:59 IST2015-06-09T00:59:13+5:302015-06-09T00:59:13+5:30

विधान परिषद निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच देण्याच्या (कॅश फॉर वोट) प्रकरणाला सोमवारी अचानक वेगळी कलाटणी मिळाली.

Crime against Andhra Pradesh in Rao | राव यांच्या विरुद्ध आंध्र प्रदेशात गुन्हा

राव यांच्या विरुद्ध आंध्र प्रदेशात गुन्हा

हैदराबाद : विधान परिषद निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी लाच देण्याच्या (कॅश फॉर वोट) प्रकरणाला सोमवारी अचानक वेगळी कलाटणी मिळाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे फोन कथितरीत्या बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी आंध्र पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
एक स्थानिक वकील एनव्हीव्ही प्रसाद यांच्या तक्रारीनंतर के. चंद्रशेखर राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राव यांनी तेदेपा नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची हेरगिरी चालविल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
कॅश फॉर वोट प्रकरणात यापूर्वीच तेलगू देसम पार्टीचे (तेदेपा) आमदार रेवानाथ रेड्डी यांना अटक झाली आहे.
आता आंध्रचे मुख्यमंत्री आणि तेदेपाप्रमुख चंद्राबाबू नायडू यांचेही नाव या प्रकरणात आले आहे. रविवारी रात्री स्थानिक वृत्तवाहिन्यांनी चंद्राबाबू आणि नामनियुक्त आमदार एल्विस स्टिफन्सन यांच्यातील कथित संभाषणाची एक आॅडिओ टेप प्रसारित केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Crime against Andhra Pradesh in Rao