क्रिकेट बुकी खून प्रकरण -- जोड

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30

या खुनात अटक झालेल्या आरोपींचे आणखी कोणी साथीदार सहभागी आहेत काय, कोणी सूत्रधार आहे काय, हे हुडकून काढण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली. आरोपींचे वकील ॲड. लुबेश मेश्राम यांनी आरोपींना कमी मुदतीची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Cricket bookie murder case - add | क्रिकेट बुकी खून प्रकरण -- जोड

क्रिकेट बुकी खून प्रकरण -- जोड

खुनात अटक झालेल्या आरोपींचे आणखी कोणी साथीदार सहभागी आहेत काय, कोणी सूत्रधार आहे काय, हे हुडकून काढण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाकडून करण्यात आली. आरोपींचे वकील ॲड. लुबेश मेश्राम यांनी आरोपींना कमी मुदतीची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

बुकींचे दुबई कनेक्शन

सूत्रांच्या माहितीनुसार शीतल हा संपूर्ण विदर्भात वरच्या फळीतील क्रिकेट सट्टा बुकी होता. अजय नावाच्या आपल्या भावासोबत तो हा धंदा करायचा. अजय हा वर्धा मार्गावरील एका हॉटेलात पकडल्या गेल्यापासून तो गोव्यात स्थायिक झाला. शीतलला आपल्या भागातील सट्ट्याची संपूर्ण उतारी अजयकडे करायचा आणि अजय हा ही उतारी दुबईत करायचा. राऊत बंधुंच्या या धंद्याचे नेटवर्क दुबईपर्यंत होते. शहर पोलीस या नेटवर्कपासून अनभिज्ञ होते, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Cricket bookie murder case - add