शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

गाय ऑक्सिजन घेते अन् ऑक्सिजनच सोडते; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 15:20 IST

गायीजवळ राहिल्यास श्वसनाचे आजार बरे होत असल्याचं विधान

डेहराडून: ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडणारा गाय हा जगातील एकमेव प्राणी असल्याचं विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं आहे. गायीला काही वेळ गोंजारल्यानं श्वसनाचे आजार बरे होतात, असंदेखील ते पुढे म्हणाले. गायीची उपयोग्यता सांगणारा रावत यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाय प्राणवायू (ऑक्सिजन) सोडते, त्यामुळेच तिला माता म्हटलं जातं. गायीचं शेण आणि गोमूत्र आपल्यासाठी फायदेशीर असतं. त्याचा वापर किडनी आणि हृदयाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी होतो. एखादा क्षयरोगी गायीच्या आसपास राहिल्यास तो ठीक होऊ शकतो. आता आपले वैज्ञानिकदेखील या गोष्टींना दुजोरा देत आहेत, असं रावत व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्टीकरण जारी केलं. 'डोंगराळ भागात राहणाऱ्यांना गायीबद्दल आदर वाटतो. गायीबद्दल त्यांना वाटणाऱ्या भावनाच मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवल्या. मात्र काही जण मुख्यमंत्र्यांचा दुस्वास करतात. अशा व्यक्तींकडून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा डागाळण्याची कामं केली जातात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी रावत यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. याआधी त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते विप्लब देव यांनी बदकांचं महत्त्व सांगताना अजब दावा केला होता. पाण्यात बदक पोहल्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं असं विधान त्यांनी केलं होतं. पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्यासाठी संपूर्ण राज्यात बदकांचं वाटप करण्याचा विचार करत असल्याचंदेखील ते म्हणाले होते. बदक वाटल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचं रिसायकलिंग होतं आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असं देव म्हणाले होते.  

टॅग्स :cowगायBJPभाजपा