शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नाच्या विषबाधेतून गाईंचा मृत्यू

By admin | Updated: April 11, 2015 01:41 IST

घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील घटना : शेतकऱ्यांमध्ये संताप

घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील घटना : शेतकऱ्यांमध्ये संताप
फोटो - रॅपमध्ये
नागपूर : उघड्यावर टाकलेले अन्न खाल्यामुळे विषबाधा झाल्याने घोगली, गोठाडी, पाथरी परिसरातील शेतकऱ्यांच्या जवळपास १० गाईंचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ गायी अस्वस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जनावरांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने, परिसरातील शेतकरी संतप्त असून, पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवार, ५ एप्रिल रोजी घोगली परिसरात रमेश लोखंडे यांच्याघरी लग्न कार्य होते. लग्नकार्य उरकल्यानंतर उरलेले अन्न कॅटरर्सच्या लोकांनी जवळच्या शेताच्या धुऱ्यावर टाकले. दोन ते तीन दिवसानंतर अन्न कुजल्याने, त्यावर बुरशी चढली होती. परिसरातील जनावरांनी पडलेले सडके अन्न खाल्ल्यामुळे अनेक गाई आजारी पडल्या. काही गाईंचा शेतातच मृत्यू झाला. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जवळपास १० गाई मृत्युमुखी पडल्या असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर तेवढ्याच गाईंवर उपचार सुरू आहे. कुजलेले अन्न खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घोगलीतील संतोष वनोकर, नाना रहाटे यांच्या दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी लोखंडे कुटुंबीयांशी संपर्क साधून नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र त्यांनी कॅटरींगवाल्याकडे बोट दाखवून, याप्रकरणातून हात काढून घेतला. दुभती जनावरे गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पोलिसात तक्रार करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.