गाय फक्त हिंदूंची नाही तर मुस्लिमांचीही माता - शंकराचार्य स्वामी

By Admin | Updated: August 24, 2016 08:00 IST2016-08-24T08:00:40+5:302016-08-24T08:00:40+5:30

गाय फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांचीही माता आहे, कारण तिचं दूध जितकं हिंदू धर्मियांसाठी लाभदायक आहे तितकंच मुस्लिम धर्मियांसाठीदेखील आहे असं शंकराचार्य स्वामी म्हणाले आहेत

The cow is not only of Hindus but also the mother of Shankaracharya Swami | गाय फक्त हिंदूंची नाही तर मुस्लिमांचीही माता - शंकराचार्य स्वामी

गाय फक्त हिंदूंची नाही तर मुस्लिमांचीही माता - शंकराचार्य स्वामी

>- ऑनलाइन लोकमत
हरिद्वार, दि. 24 - 'गाय फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांचीही माता आहे, कारण तिचं दूध जितकं हिंदू धर्मियांसाठी लाभदायक आहे तितकंच मुस्लिम धर्मियांसाठीदेखील आहे', असं वक्तव्य द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केलं आहे. 'गाईच्या दुधातून तितकंच प्रोटीन हिंदूंना मिळतं जितकं मुस्लिम धर्मियांना मिळतं. त्यामुळे गाय हिंदूंसोबत मुस्लिमांचीही माता आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही', असंही शंकराचार्य स्वामी बोलले आहेत.
 
(शिर्डीच्या साईबाबांची पुजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य स्वामी)
 
'कोणी कोणत्याही धर्माचा असो मात्र गाईला वाचवणं भारतीयांच्या हिताचं आहे. देशभरात अनेक ठिकाणी गोहत्येविरोधात कायदे बनण्यात आले आहेत, आणि यामध्ये काही चुकीचं नाही', असं सांगताना शंकराचार्य स्वामी यांनी कायद्यांचं समर्थन केलं आहे. 
 
'गोहत्येविरोधात बनवण्यात आलेल्या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे, मात्र अशा याचिका नेहमी फेटाळल्या जातात. गोहत्येसोबतच आता गोमांस विक्रीवर बंदी आणणारा कायदा आणला पाहिजे', असं मत शंकराचार्य स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. 
 

Web Title: The cow is not only of Hindus but also the mother of Shankaracharya Swami