शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश : थोडक्यात महत्वाचे

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

बॉम्बस्फोटात एक ठार

बॉम्बस्फोटात एक ठार
कैरो : इजिप्तच्या गरबीया प्रांतातील अल महल्ला अल कोबरा शहरात शुक्रवारी रात्री बॉम्बस्फोट झाला. यात एक पोलीस ठार, तर इतर १० जण जखमी झाले. स्फोटानंतर रुग्णवाहिका पाठवून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळ्या घालून हत्या
आसंसियन : ब्राझीलच्या पॅराग्वे शहरात रेडिओ पत्रकाराची हत्या करण्यात आली. गेरार्दो सर्वियन असे या पत्रकाराचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या बंदूकधार्‍यांनी त्यांच्यावर नऊ गोळ्या झाडल्या. मादक पदार्थ व शस्त्र तस्करीसाठी हे शहर कुख्यात आहे.
ओलिस महिलेची सुटका
अबूजा : नायजेरियात अपहरण करण्यात आलेल्या अमेरिकी महिलेची सुटका करण्यात आली आहे. ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम करणार्‍या फिलीस सोर्टोर यांचे अज्ञात बंदूकधार्‍यांनी महिनाभरापूर्वी अपहरण केले होते.
भ्रष्टाचाराचा आरोप
न्यूयॉर्क : डेमोक्रॅ्रटिक पक्षाचे सिनेट सदस्य रॉबर्ट मेनेन्डेझ यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला जाण्याची चिन्हे आहेत. रॉबर्ट यांनी डेमोक्रॅटिक देणगीदाराचे हित जपण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे; मात्र रॉबर्ट यांनी हा आरोप फेटाळला आहे.
भारतीयाला कारावास
लंडन : नवी दिल्ली-लंडन विमानात शालेय विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या मनजितसिंग संधू याला चार महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला. पीडित विद्यार्थिनी (१४) त्याच्या पाठीमागील आसनावर बसलेली होती.
गोळ्या घातल्या
बीजिंग : चिनी रेल्वेस्थानकावर चाकूहल्ला झाल्यानंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले. गुआंगझोऊ रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. चाकूहल्ल्यात नऊ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१८ जागा सत्ताधार्‍यांना
इस्लामाबाद : पाकिस्तानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी (सिनेट) झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीगने ४८ पैकी १८ जागा जिंकल्या. त्यामुळे या पक्षाचे सभागृहातील प्रतिनिधित्व आता पाकिस्तान पीपल्स पार्टीएवढे झाले आहे.