शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

Coronavirus: लाट वेगाने ओसरतेय; ७४ दिवसांत प्रथमच ७० हजारांवर रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 6:34 AM

देशाचा पॉझिटिव्हिटी दर आला ४.७२ टक्क्यांवर; ६ मे : ४ लाख १४ हजार, १४ जून : ७० हजार ४२१

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७०,४२१ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३,९२१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ७४ दिवसांत एवढे कमी रुग्ण प्रथमच आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २,९५,१०,४१० इतकी झाली आहे. 

मागील २४ तासांत १,१९,५०१ रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्ण बरे झाले. देशात पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या २,८१,६२,९४७ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे. ६ मे रोजी कोरोनाचे सर्वाधिक ४ लाख १४ हजार नवे रुग्ण आढळले होते.

देशात आता एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ९५ लाख १० हजार ४१० झाली, दोन महिन्यांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या ९ लाख ७३ हजार १५८ तर एकूण मृत्यूंची संख्या ३,७४,३०५ झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३.३० टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४३ टक्के एवढा झाला आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचा दर ४.७२ टक्के आहे.     दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच शून्य रुग्णn कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धारावी पॅटर्नच बेस्ट असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदा सोमवारी धारावीत कोणीही बाधित आढळून आले नाही. यापूर्वी सहा वेळा येथे शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. n सध्या या भागात केवळ १३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सहा घरी उपचार घेत आहेत, तर चार रुग्णालयांत आणि तीन रुग्ण काेराेना काळजी केंद्र-२ येथे आहेत. 

मुलांवरील कोवॅक्सिनच्या चाचण्यांसाठी निवड सुरू६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांसाठी मुलांची निवड प्रक्रिया दिल्लीतील एम्स रुग्णालय मंगळवारपासून सुरू करणार आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचण्या करण्यात येतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या