शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 08:33 IST

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या भारतात १ हजारांच्या वर गेली आहे तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेराज्यात येणाऱ्या काळात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीमुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा दावा

हैदराबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील बहुतांश देशाला विळख्यात ओढलं आहे. चीनपेक्षाही अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत १ लाख ४२ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ हजार ४०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या भारतात १ हजारांच्या वर गेली आहे तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रात १८६, केरळमध्ये १८२, कर्नाटक ७६, तेलंगणा ७० या चार राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगणामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यूही झाला आहे. याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ७ एप्रिलपर्यंत तेलंगणा कोरोनामुक्त राज्य बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहेत. जर लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केले तर राज्यात येणाऱ्या काळात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही. २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.

 

या बैठकीला पोलीस अधिक्षक, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत २५ हजार ९३७ जणांना होम क्वारंटाईन केलं आहे. ७० रुग्णापैकी ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. अनेक जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सोमवारी ११ जणांना डिस्चार्ज देणार आहोत. उरलेल्या ५९ रुग्णांपैकी ७५ वर्षाच्या एक रुग्ण वगळता उर्वरित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या सर्वांना ७ एप्रिलपर्यंत डिस्चार्ज दिलं जाईल. ७५ वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर नाही पण त्यांना ठिक व्हायला वेळ लागणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत राज्य लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा आहे. आम्ही कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहोत. एअरपोर्ट, सार्वजनिक वाहतूक आणि राज्याची सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता फारच कमी आहे असं मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिकाTelanganaतेलंगणाMaharashtraमहाराष्ट्र