शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : समोसा भिजवा दो... कंट्रोल रुमला फोन करणाऱ्याची पोलिसांनी खोड मोडली, अशी शिक्षा दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:03 IST

Coronavirus : कंट्रोल रुमला एकाने घरातून फोन करून चार समोसा भिजवा दो असं सांगत मस्करी केली. मात्र त्याची ही मस्करी त्याच्या अंगलट आली आहे.

नवी दिल्ली - चीनच्या वुहान शहरातून वेगाने पसरलेल्या कोरोनाने जगातील अन्य देशात शिरकाव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कंट्रोल रुम सुरू करण्यात आले आहे. मात्र कंट्रोल रुमला फोन करून काही जण त्रास देत असल्याची माहिती समोर आली आहे. फोन करून मस्करी करणं एकाला चांगलचं महागात पडलं आहे.

कंट्रोल रुमला एकाने घरातून फोन करून चार समोसा भिजवा दो असं सांगत मस्करी केली. मात्र त्याची ही मस्करी त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी फोन करण्याला चांगलीच अद्दल घडवली असून नाला साफ करण्याचं काम दिलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दरम्यान एका व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन केला आणि चार समोसा भिजवा दो असा थेट पोलिसांनाच आदेश दिला. पोलिसांनी हा फोन करणाऱ्याचा शोध घेतला आणि रात्रीच त्याला शोधून काढलं. त्याला नाला साफ करण्याचं काम दिलं आणि त्याच्याकडून नाला साफ करून घेतला. रामपूर जिल्हाधिकाऱ्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे भारतात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 वर पोहोचला आहे. देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पुढे वाढ करण्यात येईल, याबाबतचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले असून त्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. या बातम्यांना कुठलाही आधार नाही, असे सरकारनने स्पष्ट केले आहे. पीआयबीच्या ट्टविटनुसार, कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारकडून तसा कुठलाही प्रयत्न नसून या बातम्या वाचून मी स्वत: चिंताग्रस्त आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे गौबा यांनी म्हटलंय. यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेनीही या वृत्ताचे खंडन केले होते. 

कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलने तब्बल 450 किमी पायी प्रवास केल्याची कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. चालून, चालून पाय सूजले मात्र तरीही ते कामावर हजर झाले आहेत. दिग्विजय शर्मा असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून सर्वांनी त्यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. दिग्विजय राजगढ जिल्ह्यातील पचोर ठाण्यात काम करतात. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर गेले होते. मात्र त्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांनी पायीच कामावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी  तब्बल 450 किमी अंतर पायी प्रवास केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : देशसेवेसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी त्यांनी केला तब्बल 450 किमी पायी प्रवास

Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन

Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'

Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत

Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसDeathमृत्यूIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश