coronavirus priyanka gandhi appeals to telecom companies free all kinds of calls for month SSS | Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन

Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचं संकट ओळखून मोदींनी हा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या रुग्णापासून सुरुवात झालेल्या देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 1000 चा टप्पा पार केला आहे. सद्यस्थितीत देशात 1024 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढत असल्याने ही आता चिंतेची बाब बनली आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टेलिकॉम कंपन्यांना आवाहन केलं आहे. 

कोरोना संकटात कंपन्यांनी मोबाईल सेवा निशुल्क करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी सर्व टेलिकॉम कंपन्यांकडे केली आहे. 'कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि गरीबांकडचे पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. टेलिकॉम कंपन्यांनी पुढील एक महिन्यासाठी इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्स निशुल्क म्हणजेच मोफत करावेत. यामुळे गरीबांना आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलताना कोणतीही अडचण येणार नाही' असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. एक महिन्यापर्यंत सर्व कॉल्स मोफत करण्यासाठी त्यांनी जिओचे प्रमुख मुकेश अंबानी, व्होडाफोन-आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला, बीएसएनएलचे पी.के. पुर्वर आणि एअरटेलच्या भारती मित्तल यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात लॉकडाऊनमुळे हजारो लोक घराकडे निघाले आहेत. त्यांच्या फोनमधील बॅलेन्स देखील संपला आहे आणि पुन्हा रिचार्ज करण्यासाठी त्यांच्याकडे आता पैसे देखील नाहीत. यामुळे ते आपल्या कुटुंबीयांशी बोलू शकत नाही आणि त्यांचे फोनही घेऊ शकत नाही. यामुळे महिन्याभरासाठी मोबाईलचे इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स निशुल्क करण्यात यावे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुरांसाठी काही महत्त्वाचे पावले उचलली जावीत आणि काही आर्थिक मदत त्यांना केली जावी असं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी 4.4 कोटी बांधकाम कामगारांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागत आहे. कारण, यातील अनेक जण शहरात फसले आहेत आणि लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाआहे. कॅनडासारख्या अनेक देशांनी कोरोनासारख्या संकटादरम्यान आर्थिक योजना आखल्या आहेत. येथील परिस्थिती पाहता कामगारांसाठी काही ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.
 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'

Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत

Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण

coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर

Coronavirus: 7 एप्रिलपर्यंत 'हे' राज्य होणार कोरोनामुक्त; खुद्द मुख्यमंत्र्यांचीच भविष्यवाणी

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus priyanka gandhi appeals to telecom companies free all kinds of calls for month SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.