Coronavirus bhopal police constable reached duty by walking 450 km SSS | Coronavirus : देशसेवेसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी त्यांनी केला तब्बल 450 किमी पायी प्रवास

Coronavirus : देशसेवेसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी त्यांनी केला तब्बल 450 किमी पायी प्रवास

भोपाळ - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1000 हून अधिक  झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना गेल्या रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. याचदरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये ड्यूटीवर पोहोचण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलने तब्बल 450 किमी पायी प्रवास केल्याची कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. चालून, चालून पाय सूजले मात्र तरीही ते कामावर हजर झाले आहेत. दिग्विजय शर्मा असं पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून सर्वांनी त्यांच्या जिद्दीला सलाम केला आहे. दिग्विजय राजगढ जिल्ह्यातील पचोर ठाण्यात काम करतात. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीवर गेले होते. मात्र त्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांनी पायीच कामावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी  तब्बल 450 किमी अंतर पायी प्रवास केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय शर्मा हे 16 मार्च रोजी कामासंदर्भातील परीक्षा देण्यासाठी सुट्टीवर आपल्या गावी  गेले होते. मात्र लॉकडाऊन झाल्याने त्यांची परीक्षा झाली नाही. त्यामुळे त्यांना कामावर जायचं होतं. मात्र वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांच्याकडे कोणतंही साधन नव्हतं. लॉकडाऊनमुळे त्यांना कित्येक किलोमीटर अंतर पायी पार करावे लागले, काही वेळा त्यांना लिफ्टही मिळाली. लॉकडाऊन असल्याकारणाने रस्त्यात जेवणाची व्यवस्था नसल्याने अनेकदा त्यांना उपाशी राहावे लागले. मात्र तरीही ते थांबले नाहीत आणि 28 मार्च रोजी राजगडला पोहोचले. 450 किलोमीटर पायी चालल्याने दिग्विजय यांच्या पायाला सूज आली होती. देशसेवा आणि कामाप्रती असलेलं प्रेम पाहून मध्य प्रदेशातीलपोलिसांसह सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पुढे वाढ करण्यात येईल, याबाबतचे वृत्त केंद्र सरकारने फेटाळले असून त्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. या बातम्यांना कुठलाही आधार नाही, असे सरकारनने स्पष्ट केले आहे. पीआयबीच्या ट्टविटनुसार, कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारकडून तसा कुठलाही प्रयत्न नसून या बातम्या वाचून मी स्वत: चिंताग्रस्त आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे गौबा यांनी म्हटलंय. यापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेनीही या वृत्ताचे खंडन केले होते. 


महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...म्हणून मोबाईल सेवा निशुल्क करा, प्रियंका गांधींचं टेलिकॉम कंपन्यांना आवाहन

Coronavirus : 'भारतात फक्त 21 नव्हे तर 49 दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक'

Coronavirus: कोरोनाशी लढण्यासाठी Googleचा पुढाकार, सुंदर पिचाईंनी केली 5,900 कोटींची मदत

Coronavirus: चिंताजनक! भारतात कोरोनाचा धोका वाढला; महाराष्ट्रात ५ दिवसात आढळले १०० नवे रुग्ण

coronavirus : अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाचे थैमान, जगभरात मृतांचा आकडा 34 हजारावर

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus bhopal police constable reached duty by walking 450 km SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.