शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

CoronaVirus News: देशातील ऑक्सिजनचा साठा गेला कुठे?; मोदी सरकारचा निर्णय पाहून तुम्हालाही धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:21 AM

CoronaVirus News: देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा; ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.  देशात दोन आठवड्यांपूर्वी सर्वप्रथम दिवसभरात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांतच हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. आता गेला आठवडाभर देशात दररोज कोरोनाच्या २ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा कोसळण्याच्या स्थितीत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांवर व्यवस्थित उपचार होताना दिसत नसल्याचं चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. तब्बल ५०० कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात; अखेरच्या काही मिनिटांत घडला चमत्कारऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण दगावल्याच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. रुग्णाला ऑक्सिजन मिळावा यासाठी त्याच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू आहे. देशात ऑक्सिजनची टंचाई जाणवत असताना मोदी सरकारनं घेतलेला एक निर्णय समोर आला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये देशातून तब्बल ९ हजार २९४ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केला गेल्याचं वृत्त मनीकंट्रोल या वृत्त संकेतस्थळानं दिलं आहे.'मुन्नाभाई'लाही लाजवेल अशी वेळ; कोरोना रुग्ण बेड घेऊन हॉस्पिटलबाहेर आलावाणिज्य विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल ते जानेवारी या कालावधीत ९ हजार २९४ मेट्रिक टन ऑक्सिजन देशाबाहेर पाठवण्यात गेल्या. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा आकडा दुपटीहून अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४ हजार ५०२ मेट्रिक टन ऑक्सिजन देशाबाहेर पाठवला गेला होता. निर्यात करण्यात आलेला ऑक्सिजनचा साठा द्रवरुपात होता. त्याचा वापर औद्योगिक आणि वैद्यकीय कारणांसाठी केला जाऊ शकतो.देशातीन निर्यात करण्यात आलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी ९५ टक्क्यांहून अधिकचा साठा एकट्या बांग्लादेशाला पाठवण्यात आला. बांगलादेशला तब्बल ८ हजार ८२८ मेट्रिक टन ऑक्सिजन भारताकडून देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून बांगलादेश भारताकडून आयात करत असलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी कमी होत गेलं. मात्र कोरोना संकट येताच बांगालदेशानं ऑक्सिजनची आयात वाढवली. सुरुवातीला बांगलादेशानं प्रामुख्यानं औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन मागवला. पण त्यानंतर बांगलादेश वैद्यकीय कारणांसाठी ऑक्सिजनची आयात करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या