CoronaVirus News : ICMR says following all globally accepted norms to fast-track vaccine; wants to 'cut red tape' | CoronaVirus News : कोरोनावरील लस 'COVAXIN'ची प्रीक्लिनिकल स्टडी पूर्ण, आता लवकरच मानवी चाचणी

CoronaVirus News : कोरोनावरील लस 'COVAXIN'ची प्रीक्लिनिकल स्टडी पूर्ण, आता लवकरच मानवी चाचणी

ठळक मुद्देआयसीएमआरने शनिवारी या लसीसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये लसीचे प्रीक्लिनिकल स्टडी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन (COVAXIN) येत्या 15 ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआर मार्फत या लसीचे लाँचिंग होऊ शकते. 

आयसीएमआरने शनिवारी या लसीसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यामध्येलसीचे प्रीक्लिनिकल स्टडी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता ह्युमन ट्रायलचा (मानवी चाचणी) टप्पा १ आणि २ सुरू होणार आहे, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

याचबरोबर, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी स्वदेशी लसीची चाचणी लवकर करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे, असे आयसीएमआरने सांगितले आहे. तसेच, लसीसंदर्भात आयसीएमआरची प्रक्रिया जागतिक स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या निकषानुसार ठीक आहे.

आमचे उद्दिष्ट लसीचे सर्व टप्पे लवकरात लवकर पूर्ण करणे आहे, जेणेकरून लोकसंख्या-आधारित चाचण्या विनाविलंब सुरू करता येतील, असेही आयसीएमआर नमूद केले आहे. दरम्यान, देशात कोव्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायल (मानवी चाचणीसाठी) परवानगी देण्यात आली आहे. 

आयसीएमआरने जारी केलेल्या पत्रानुसार, ७ जुलैपासून मानवी चाचण्यांसाठी इनरोलमेंट सुरु होईल. यानंतर, जर सर्व चाचण्या योग्य झाल्या असतील तर १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सिन लाँच केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वात आधी भारत बायोटेकची लस बाजारात येऊ शकते.

गेल्या काही दिवसांपूर्वी हैदराबादस्थित फार्मा कंपनी भारत बायोटेकने दावा केला की, कोव्हॅक्सिनच्या फेज -१ आणि फेज -२ मानवी चाचण्यांनाही डीसीजीआयकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चाचणीचे काम सुरू केले जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. 

आणखी बातम्या ....

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर

Jammu and Kashmir : कुलगाममध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : ICMR says following all globally accepted norms to fast-track vaccine; wants to 'cut red tape'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.