Security forces kill terrorists in kulgam encounter seize several weapons including grenade launchers in rajouri | Jammu and Kashmir : कुलगाममध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

Jammu and Kashmir : कुलगाममध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा, दोन जवान जखमी

ठळक मुद्देसुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी राजौरी जिल्ह्यातील थानमंडी भागातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात येथील स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान कारवाई करत आहेत. काश्मीरच्या कोणत्या-ना-कोणत्या भागात दररोज दहशतवाद्यांसोबत चकमक सुरुच आहे. शनिवारी काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत जवनांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू होते.  यावेळी दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, या चकमकीत दोन सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले. 

विशेष म्हणजे,  सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी राजौरी जिल्ह्यातील थानमंडी भागातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. तसेच, दहशतवाद्यांच्या या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडा जिल्हा पूर्णपणे दहशतवाद्यांपासून मुक्त घोषित केला होता. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून दरम्यान 118 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तर जूनमध्येच सुरक्षा दलांनी 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

शुक्रवारी एक जवान शहीद झाला
शुक्रवारी जम्मू-कश्मीरच्या राजधानी श्रीनगरच्या मालबाग भागात दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. सुरक्षादलानेही एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. खात्मा झालेला दहशतवादी हा जाहीद होता, त्याने गेल्या आठवड्यात अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहड़ामध्ये सीआरपीएफ पार्टीवर हल्ला केला होता.
 

आणखी बातम्या ....

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरेंचा खुलासा, म्हणाले...

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Security forces kill terrorists in kulgam encounter seize several weapons including grenade launchers in rajouri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.