lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर 

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर 

रोख व्यवहार कमी करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 04:10 PM2020-07-04T16:10:35+5:302020-07-04T16:17:24+5:30

रोख व्यवहार कमी करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

tds on cash withdrawal latest news income tax department launches tool to calculate tds rate on cash withdrawals | कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर 

कॅश काढल्यास भरावा लागेल टॅक्स; नियम समजावण्यासाठी आयकर विभागानं आणलं कॅलक्युलेटर 

Highlightsनियम अधिक सुलभ आणि लोकांना पटवून देण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन टूल सुरू केले आहे.

नवी दिल्ली : एका वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर २ टक्के टीडीएस (TDS) कपात केली जाणार आहे. आता हा नियम लागू करण्यात आला आहे. रोख व्यवहार कमी करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

आता हा नियम अधिक सुलभ आणि लोकांना पटवून देण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन टूल सुरू केले आहे. या टूलमधून ग्राहक कलम 194N अंतर्गत टीडीएस कॅलक्युलेटर करू शकतात.

हा नियम यासाठी लागू होत नाही : सरकार, बँकिंग कंपनी, बँकिंग सहकारी संस्था, टपाल कार्यालय, बँकिंग प्रतिनिधी आणि व्हाईट लेबल एटीएम चालविणाऱ्या घटकांवर हा नियम लागू होणार नाही. कारण त्यांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरावी लागते.

आता नवीन टूल : आयकर विभागाकडून सुरू करण्यात आलेला नवीन कॅलक्युलेटर टूल बँका, सहकारी संस्था आणि टपाल कार्यालयांच्या अधिकृत वापरासाठी आहे.

>> सध्या हा टूल आयकर विभागाच्या संकेतस्थळावर ''Quick Links' च्या खाली 'Verification of applicability u/s 194N' अशा नावाने दिसत आहे.

>> टीडीएस दराची एप्लिकेबिलिटी तपासण्यासाठी युजर्सला बँकेकडून आपला पॅन नंबर व मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे.

>> टीडीएसला आयकर रिटर्न फाईल करण्यासह लिंक करण्याच्या उद्देशाने हा नियम आणला गेला आहे. मागील ३ वर्षांपासून तुम्ही जर आयकर भरला नसेल तर २० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठी बँक तुमच्याकडून २% टीडीएस आकारेल.

>> जर ही रक्कम 1 कोटींपेक्षा जास्त असेल तर 5 टक्के पर्यंतचा टीडीएस आकारला जाऊ शकतो. ज्यांनी गेल्या ३ वर्षात आयकर भरला आहे, त्यांना १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठी टीडीएस लागणार नाही.
 

आणखी बातम्या ....

आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये? ऊर्जामंत्री होण्याची शक्यता

TikTok सारखं भारतीय Moj अ‍ॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स    

Web Title: tds on cash withdrawal latest news income tax department launches tool to calculate tds rate on cash withdrawals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.