शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

CoronaVirus News : येत्या दोन ते तीन दिवसांत सरकार नवं पॅकेज देणार, नितीन गडकरींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:44 AM

येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे. 

ठळक मुद्देटाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. आता सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे.

नवी दिल्ली: कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही याचा फटका बसला आहे. टाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होत आहे. आता सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत नवं पॅकेज देणार असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री आणि एमएसएमई खात्याचे मंत्री असलेल्या नितीन गडकरींनी दिली आहे. कोरोनाच्या संकटात उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दिलासादायक पॅकेज जाहीर करणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील उद्योग व वाणिज्य सदस्यांशी झालेल्या संभाषणादरम्यान गडकरींनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, येत्या 2 ते 3 दिवसांत सरकार मदत पॅकेज जाहीर करेल. सरकारला आपल्या मर्यादा आहेत. प्रत्येकाला वाचवण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.अर्थ मंत्रालय व पीएमओ यांना शिफारसी पाठविण्यात आल्या नितीन गडकरी हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) खात्याचे मंत्रीदेखील आहेत. ते म्हणाले की, एमएसएमई मंत्रालयाने वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालया(पीएमओ)ला आपल्या शिफारसी पाठवल्या आहेत. लघु उद्योगांना वेळेवर थकबाकी परतावा मिळावा आणि त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकार 1 लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर काम करत असल्याचंही गेल्या महिन्यात नितीन गडकरींनी सांगितलं होतं. एमएसएमई क्षेत्राला सरकारी पाठबळाची गजरलॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर झाला आहे. हे क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि कोट्यवधी लोकांना रोजगार देते. गरीब, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसाठी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कित्येक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. परंतु असे असले तरी एमएसएमई क्षेत्राला बळ देण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. केंद्र सरकार सर्व उद्योगांना सतत पाठिंबा देत आहे. व्यावसायिकांनीही हे समजून घ्यावे लागेल की सरकारची आर्थिक स्थितीदेखील दडपणाखाली आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus : निसर्गाचा चमत्कार! बिजनौरहून स्पष्ट दिसतोय नैनितालचा पर्वत

चीनच्या हेलिकॉप्टर्सची LACच्या हद्दीत घुसखोरी, भारतीय IAF लढाऊ विमानांनी लावलं हुसकावून

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार