शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मुंबईत प्रत्येक १०० पैकी ७० कोरोना रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 06:25 IST

प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणारांची संख्या दिल्ली, अहमदाबाद व चेन्नईत सर्वांत जास्त आहे, तर चेन्नई, ठाणे व पुण्यात मृत्यूंची संख्या सर्वांत कमी आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना संक्रमितांची संख्या सतत वाढत असली तरी देशात सर्वाधिक संक्रमितांची संख्या असलेल्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, ठाणे व अहमदाबादमध्ये एकीकडे संक्रमित बरे होण्याची सरासरी सुधारत आहे व दुसरीकडे मृत्यूची संख्याही कमी होत आहे. प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणारांची संख्या दिल्ली, अहमदाबाद व चेन्नईत सर्वांत जास्त आहे, तर चेन्नई, ठाणे व पुण्यात मृत्यूंची संख्या सर्वांत कमी आहे. तथापि, पुण्यात बरे होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.१२ जुलै रोजी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, कोरोना संक्रमित प्रत्येक १०० व्यक्तींपैकी दिल्लीत ७९ पेक्षा अधिक जण बरे झाले आहेत व सुमारे ३ लोकांचा मृत्यू झाला. विविध शहरांत बरे होणाऱ्यांचा व मृत्यूचा आकडा पुढीलप्रमाणे : मुंबई ६९.१४ व ५.७२, चेन्नई ७४.७७ व १.६०, ठाणे ४२.८७ व २.६९, पुणे ४२.८७ व २.८४ तसेच अहमबादेत ७७.६० व ६.६१.तथापि, या आठवड्यापूर्वी ४ जुलै रोजी दिल्लीत प्रत्येक १०० रुग्णांपैकी बरे होणाºयांची संख्या ७० व मृत्यू होणाºयांची संख्या ३ होती. त्याचवेळी मुंबईत हा दर क्रमश: ६४.२३ व ५.८, चेन्नईत ६२.०८ व १.५५ होता. ठाण्यात प्रत्येक १०० पैकी बरे होणाºयांचा व मृत्यूचा आकडा क्रमश: ३८.९५ व २.७४, पुण्यात ४८.४६ व ३.१२, अहमदाबादेत ७६.५ व ६.७९ होता.दोन आठवड्यांपूर्वी २८ जून रोजी दिल्लीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८३,०७७ होती. त्यातील ५२,६०७ बरे झाले, तर २,६२३ जणांचा मृत्यू झाला. प्रत्येक १०० रुग्णांपैकी ६३.३२ टक्के जण बरे झाले.पुण्यात मंदावले बरे होण्याचे प्रमाणमागील दोन आठवड्यांमध्ये पुण्यात संक्रमित होण्याच्या सरासरीत वेगाने घट झाली आहे. २८ जून रोजी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, एकूण २०,८७० पैकी १०,७०८ बरे झाले; परंतु १२ जुलै रोजी बरे होण्याचे प्रमाण कमी झाले. ताज्या आकडेवारीनुसार, एकूण ३७,३५६ पैकी १६,०१६ रुग्णबरे झाले. यानुसार, बरे होणाºयांचे प्रमाण ५१.३१ टक्क्याांरून घसरून ४२.८७ टक्क्यांपर्यंत उतरले आहे.प्रमुख शहरांतील कोरोना संक्रमणाची स्थितीशहर एकूण संक्रमित बरे झाले (%) मृत्यू (%)दिल्ली ११0९२१ ८७६९२ (७९.0६%) ३३३४ (३.0१%)मुंबई ९१,७४५ ६३४३१ (६९.१४%) ५२४४ (५.७२%)चेन्नई ७६,१५८ ५६९४७ (७४.७७%) १२१८ (१.६0%)ठाणे ५९,४८७ २५८२९ (४३.४२%) १५९८ (२.६९%)पुणे ३८,३५६ १६0१६ (४२.८७%) १0६0 (२.८४%)अहमदाबाद २२,९२३ १७७८९ (७७.६0%) १५१५ (६.६१%)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई