शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

CoronaVirus News: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या १९६ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 2:59 AM

राज्यातील २३ डॉक्टरांचा बळी; इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तब्बल १९६ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड योद्ध्यांसाठी ही चिंतेची बाब असून यानिमित्ताने सर्व परिस्थितीची माहिती देणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७ आॅगस्टला लिहिले आहे.डॉक्टरांचे मृत्यू रोखण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रात केल्याची माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी दिली. आयएमए अहवालातील माहितीनुसार, कोरोनाग्रस्त डॉक्टरांना खाट व औषधे उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती स्वत: डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.महिनाभरापूर्वी आयएमएने जाहीर केलेल्या माहितीनुससार, देशात ९९ डॉक्टर कोरोनाने दगावले होते. आता हा आकडा वाढून १९६ वर गेला आहे. दरम्यान, १९६ डॉक्टरांमध्ये १७० डॉक्टर हे ५० वयोगटाच्या पुढचे आहेत.डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काही तरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्याचे डॉ. शर्मा म्हणाले. सरकारी डॉक्टर-कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा मिळतो, पण खासगी डॉक्टरही जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देत असून तेही मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा त्यांनाही ५० लाखांचा आरोग्य विमा लागू करावा, अशीही मागणी या पत्रात आहे.कोरोनामुळे मरण पावलेल्या डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारीदिल्ली-१२ महाराष्ट्र-२३गुजरात-२३ तामिळनाडू-४३बिहार-१५ आंध्रप्रदेश-१२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या