शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 'त्या' १५ लाख प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवा; केंद्राचे सर्व राज्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 22:33 IST

१८ जानेवारी ते २३ मार्च दरम्यान देशात आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना

नवी दिल्ली: दोन महिन्यांत परदेशातून आलेल्या १५ लाख प्रवासांना निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. १८ जानेवारी ते २३ मार्च या कालावधीत भारतात १५ लाख प्रवासी आले. सध्या यातील काही प्रवासी निरीक्षणाखाली आहेत. मात्र निरीक्षणाखाली नसलेल्या प्रवाशांची संख्या अतिशय मोठी आहे. या सर्व प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्याची सूचना केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केली आहे. आता या प्रवाशांना शोधून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचं आव्हान राज्यांसमोर आहे.  राजीव गौबा यांनी याबद्दल प्रधान सचिवांना पत्र लिहिलं असून त्या माध्यमातून परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती दिली आहे. 'परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची १८ जानेवारीपासून विमानतळांवर तपासणी सुरू करण्यात आली. २३ मार्चपर्यंत ही तपासणी सुरू होती. इमिग्रेशन ब्युरोनं अशा १५ लाखांहून अधिक प्रवाशांची यादी तयार केली आहे. ती त्यांनी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहे. मात्र विमानतळांवर तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांच्या संख्येत आणि राज्यं/केंद्रशासित प्रदेशांनी तपासणी केलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत आहे,' असं गौबा यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवणं गरजेचं असल्याचंदेखील गौबा यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं वारंवार याबद्दलची गरज व्यक्त केली होती, याकडेही त्यांनी पत्रातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्याासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनांनी तातडीनं पावलं उचलावीत, असं गौबा यांनी पत्रात म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या