CoronaVirus Marathi News covid19 patients body changed in hospital | CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

गाझियाबाद - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. दिल्लीच्याएम्स रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोवा रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईकांना मृतदेह सोपवताना मृतदेहाची अदलाबदली झाली आहे.

एका हिंदू कुटुंबाला महिलेचा मृतदेह सोपवण्यात आला. मृत व्यक्तीच्या मुलीने याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. "दिल्लीच्याएम्स रुग्णालयात आईला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मात्र उपचारादरम्यान 5 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र सकाळी अंत्यसंस्कार केल्यानंतर संध्याकाळी तुमच्या आईचा मृतदेह घेऊन जा असा फोन आला" अशी माहिती मुलीने दिली आहे. 

रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदली झाल्याने हिंदू कुटुंबाला मुस्लिम महिलेचा मृतदेह देण्यात आला. मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला असल्यामुळे ओळख पटवता आली नाही. महिलेच्या कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र रुग्णालयातून फोन आला आणि तुमच्या आईचा मृतदेह शवगृहात ठेवला असल्याचं सांगितलं. फोन आल्यानंतर हा सर्व संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : MASK लावायचा कंटाळा येतो?, 'हा' Video पाहिलात तर कधीच हटवणार नाहीत मास्क

CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची खरेदी करताना 'या' गोष्टी चेक करता का?; FDAने दिला मोलाचा सल्ला

शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी

...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

English summary :
CoronaVirus Marathi News covid19 patients body changed in hospital call after funeral take your mothers body

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News covid19 patients body changed in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.