शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:33 PM2020-07-08T13:33:16+5:302020-07-08T13:35:27+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे.

bjp ashish shelar tweet on uddhav thackeray sharad pawar matoshree meeting | शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

Next

मुंबई - देशात कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सध्या या भेटीची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या मातोश्री भेटीवरुन भाजपाचा एका नेत्यांने मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. भाजपचे नेते आणि आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

आशिष शेलार यांनी बुधवारी (8 जुलै) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "कुणाला किती वेळा, कुठे भेटावे? हा विषय त्यांचा असला तरी... आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो... त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तृत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत "आनंदीआनंदच" आहे!" असं ट्विट शेलार यांनी केलं आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मातोश्री भेटीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. "प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा 2004 साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद पवार मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. 

आशिष शेलार यांनी यूजीसीने घेतलेल्या निर्णयासंदर्भातही एक ट्विट केलं होतं. "राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. त्यामुळे विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा. आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा" असं ट्विट शेलार यांनी केलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! पगार मागितला म्हणून मालकिणीने अंगावर सोडला कुत्रा, चेहऱ्यावर 15 टाके

CoronaVirus News : कोरोना हरणार, देश जिंकणार! तब्बल 1 कोटी लोकांनी केली चाचणी

...म्हणून उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवलं 'रामायण'

"राहुल गांधी काही डॉक्टर नाहीत", 'त्या' आरोपांवर थेट कंपनीने दिलं प्रत्युत्तर

"मी महाराज किंवा टायगर नाही, कमलनाथ आहे; कोण मांजर आणि कोण उंदीर हे जनता ठरवेल"
 

Web Title: bjp ashish shelar tweet on uddhav thackeray sharad pawar matoshree meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.