CoronaVirus Marathi News amit shah tested covid 19 positive | CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 17 लाखांचा टप्पा पार केला आहे. अनेकांंना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

"रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करुन कोरोना टेस्ट करावी" असं आवाहन अमित शहा यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या बच्चनही पॉझिटिव्ह आढळून आले होते. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 54,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 37,364 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (2 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 54,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 17,50,724 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 37 हजारांवर पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video - ...म्हणून गर्भवतीला टोपलीत बसवून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात

"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर

धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी

TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅपचा लिलाव

काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी 

Read in English

English summary :
CoronaVirus Marathi News amit shah tested covid 19 positive

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News amit shah tested covid 19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.