tiktok want to change chinese app identity to survive may sell itself to microsoft | TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅपचा लिलाव

TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅपचा लिलाव

नवी दिल्ली - टिकटॉक हे व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅप अल्पावधीतच लोकप्रिय झाले. मात्र सध्या 2020 हे वर्ष टिकटॉकसाठी फारचं चांगलं नाही. काही दिवसांपूर्वी भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर अनेक देशही टिकटॉकवर बंदी घालण्याच्या विचारात आहेत. यामुळे टिकटॉकला आपले लाखो युजर्स गमावावे लागू शकतात. टिकटॉक अ‍ॅपवर युजर्सचा डेटा परवानगी शिवाय परदेशात पाठवण्याचा आणि बाहेरील सर्व्हरमध्ये स्टोर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. 

डेटा संबंधीत तक्रारीनंतर साऊथ कोरियासह अनेक देशात या अ‍ॅपवर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. चीनशी संबंधीत असल्याने या अ‍ॅपला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. टिकटॉकचा स्टाफ हा अमेरिकन आहे. तसेच चीन सरकारसोबत युजर्सचा डेटा कधीच शेयर केला नाही. मात्र टिकटॉकची पॅरंट कंपनी ByteDance चीनशी संबंधीत आहे. भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर अमेरिकेतील युजरबेस गमावण्याची भीती कंपनीला सतावत होती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिनी अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एका एक्झिक्युटीव्ह आदेशासह अमेरिकेत 24 तासांनंतर टिकटॉकवर बंदी घातली जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बाईटडान्स कंपनी टिकटॉकला विकण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कंपनीकडून मायक्रोसॉफ्टसोबत चर्चा सुरू आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. "आम्ही टिकटॉक पाहात आहोत. आम्ही यावरही बंदी घालू शकतो. आम्ही आणखी काहीही करू शकतो. आमच्याकडे इतरही अनेक पर्याय आहेत. बर्‍याच गोष्टी घडत आहेत. त्यामुळे आम्ही पाहणार की, काय होऊ शकते" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

The New York Times च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत बंदीपासून वाचवण्यासाठी टिकटॉक हे अ‍ॅप विकलं जाण्याची शक्यता आहे. टिकटॉकला मायक्रोसॉफ्ट कंपनीने खरेदी करावं असं व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिसला वाटत आहे. त्यासाठी कंपनी त्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी टिकटॉकला टार्गेट केलं जात आहे. मात्र आम्ही शत्रू नाहीत. त्यामुळे असे वाटतेय की, या अ‍ॅपने आपला पराभव मान्य केला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी टिकटॉकची विक्री करण्यात येऊ शकते असं मेयर यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी 

Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार

Sushant Singh Rajput Suicide : 'सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोणीही राजकारण करू नये', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल

CoronaVirus News : कोरोनाबाबत सर्च करणं पडू शकतं महागात, मानसिक आरोग्य धोक्यात, व्हाल 'डूम स्क्रोलिंग'चे शिकार

CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

Web Title: tiktok want to change chinese app identity to survive may sell itself to microsoft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.