शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 10:11 AM

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांची सरासरी ५० टक्क्यांकडे पोहोचत आहे.

नवी दिल्ली :  लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असताना तो उठविल्यानंतर लगेचच याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णांनी तीन लाखांचा आकडा पार केलेला असतानाच आजची आकडेवारी देशाला चिंतेत टाकणारी आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. 

देशभरातमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ११९२९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२०९२२ वर गेला आहे. तर १४९३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १६२३७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ९१९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांची सरासरी ५० टक्क्यांकडे पोहोचत आहे. दिल्लीतील गंभीर परिस्थितीमुळे गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उप राज्यपाल, उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकटात असलेल्या राज्यांना केंद्राची तातडीची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाबाधितांच्या रोजच्या संख्येत वाढ होऊ नये यावर लक्ष -सध्या देशात कोरोना केसेस वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत अधिकारी म्हणाले, जर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांचा असता, तर आतापर्यंत देशात 10 लाक रुग्ण झाले असते. या रुग्णांमध्ये गुणाकार होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी नीती आयोगाचे सदस्य आणि मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेन्ट प्‍लॅनच्या ग्रुपचे, विनोद पॉल यांनी सध्याची स्थिती आणि संभाव्य स्थितीसंदर्भात सविस्‍तर प्रेझेन्टेशन केले.

पाच राज्यांतच दोन तृतियांश कोरोनाबाधित -पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे, की "एकूण कोरोनाबाधितांपैकी दोन तृतियांश कोरोनाबाधित पाच राज्यांतच आहेत आणि तेही विशेषतः मोठ्या शहरांत. यावेळी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता बेड्सची  संख्या आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासंदर्भात चर्चा झाली." पंतप्रधानांनी शहर आणि जिल्यांतील रुग्णालये आणि आयसोलेशन बेड्सच्या आवश्यकतेसंदर्भातही जाणून घेतले. त्यांनी आरोग्य मंत्रालयाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एकत्रितपणे पुढील नियोजन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या....

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी