शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

CoronaVirus Live Updates : सुखावणारी आकडेवारी! कोरोना संकटात मोठा दिलासा; 24 तासांत 10,229 नवे रुग्ण, 125 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:22 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,44,47,536 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली -  जगात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 10,229 नवे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (15 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,44,47,536 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,34,096 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,63,655 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

देशात 3,38,49,785 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 1,12,34,30,478 लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. युरोपच्या काही भागातील परिस्थिती ही चिंताजनक आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तरी देखील वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रशासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये लस न घेणाऱ्यांविरोधात एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सरकारने अशा लोकांसाठी लॉकडाऊन लावला आहे. ज्या लोकांनी ऑस्ट्रियामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना सुविधा देण्यात येत आहेत.

कोरोनाचा धसका! लसीकरण नाही तर स्वातंत्र्य नाही; 'या' देशात लस न घेणाऱ्यांसाठी लॉकडाऊन

लसीकरण झालेल्या लोकांनी रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये जाता येत असून तिथे सुविधा देण्यात येत आहेत. मात्र ज्य़ा लोकांनी कोरोना लस घेतलेली नाही त्यांना घरामध्येच राहावं लागणार आहे. त्यांना फक्त जीवनावश्यक वस्तू आणण्याची आणि डॉक्टरांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या लोकांना आता कोरोनाची लागण झाली आहे आणि अजूनही ते बरे झालेले नाहीत अशांना देखील लॉकडाऊनमध्ये राहावं लागणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर एलेझेंडर शालेनबर्ग यांनी या कठोर नियमांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रियामध्ये सीमित लोकांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच लसीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग चांगला असून आतापर्यंत 65 टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस