शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : विदेशातून आलेल्या प्रवाशांवर करडी नजर ठेवा, सर्व राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:46 IST

CoronaVirus : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निगराणी ठेवणे जरुरी आहे, अशा आंतरराष्टÑीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्षात निगराणीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत दिसते, असे गौबा यांनी या पत्रात म्हटले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनआधी विदेशातून भारतात आलेले एकूण प्रवासी आणि कोविड-१९ संसर्गामुळे प्रत्यक्षात निगराणीत ठेवण्यात आलेल्या प्रवाशांत तफावत दिसते. यामुळे कोविड-१९ रोगाचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रयत्न धोक्यात येऊ शकतात. कारण भारतात कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींचा इतिहास आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आहे; तेव्हा विदेशातून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांवर निगराणी ठेवण्यात यावी, असे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निगराणी ठेवणे जरुरी आहे, अशा आंतरराष्टÑीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्षात निगराणीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत दिसते, असे गौबा यांनी या पत्रात म्हटले आहे.कोरोना साथीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांत भारतात आलेल्या सर्व आंतरराष्टÑीय प्रवाशांवर लक्ष ठेवणे सुरू केले. कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवणे महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही ही निगराणी अत्यंत महत्त्वाची असल्याने सातत्याने निक्षून सांगितले आहे. तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्यास सांगितले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार अशा प्रवाशांवर तात्काळ निगराणीखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून तातडीने ठोस कृती करावी.- २३ मार्च २०२० पर्यंत विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले. भारताने १८ जानेवारी २०२० पासून विमानतळावर आंतरराष्टÑीय प्रवाशांची तपासणी करणे सुरू केले. निगराणीखाली असलेल्या या १५ लाखांहून अधिक प्रवाशांचा तपशील स्थलांतर विभागाने सामायिक केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या