Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:20 AM2020-04-24T11:20:49+5:302020-04-24T11:32:42+5:30

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना काही समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

Coronavirus karnataka school students dig well to combat water crisis SSS | Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये पाणी टंचाई, विद्यार्थ्यांनी 4 दिवसांत खोदली विहीर

Next

बंगळुरू - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21,000 वर पोहचली आहे. तर 681 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फक्त जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना काही समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यावर उपाय म्हणून काही शालेय विद्यार्थ्यांनी थेट 12 फूट विहीर खोदल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे फक्त पाच विद्यार्थ्यांनी अवघ्या चार दिवसांत हे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्नाटकच्या बेलथांगडी या गावात ही घटना घडली आहे. लॉकडाऊनमध्ये या गावातील लोकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र आता विद्यार्थ्यांनी 12 फूट विहीर खोदल्याने गावातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. 

'आमच्या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी विहीर खोदायला घेतली. खोदकामाला सुरुवात केल्यानंतर आम्हाला केवळ मातीच लागत होती. पण खूप खोदल्यानंतर पाणी लागलं आहे' असं नववीत शिकणाऱ्या धनुषने म्हटलं आहे. धनुषने एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. पाण्याची समस्या दूर केल्यामुळे विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी वाशिमधील एका दाम्पत्याने लॉकडाऊनमध्ये पंचविस फूट विहीर खोदली आहे. लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील एका दाम्पत्याने करुन दाखवला. 21 दिवसांत पती-पत्नीने विहीर खोदली आहे. गजानन पकमोडे हे व्यवसायाने गवंडी काम करत असल्यामुळे सतत कामात राहण्याची सवय होती. परंतु लॉकडाऊनमुळे घरातच बसून करायचे काय हा प्रश्न पडला व एक दिवस पती-पत्नीमध्ये सहज चर्चा झाली व विहीर खोदण्याचे ठरविले. त्यानंतर 21 दिवसांत त्यांनी विहीर खोदली. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : आनंदाची बातमी! आणखी एक राज्य कोरोनामुक्त, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू

CoronaVirus: अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली; प्रसाराचा वेग स्थिर

 

Web Title: Coronavirus karnataka school students dig well to combat water crisis SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.