Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 08:50 AM2020-04-24T08:50:55+5:302020-04-24T08:55:48+5:30

Coronavirus : तीनही जवान एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Coronavirus 3 army personnel corona who withdraw money from same atm baroda SSS | Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण

googlenewsNext

बडोदा - भारतात वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 1409 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत देशात 21 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, देशात 78 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे.

एटीएममधून पैसे काढणं तीन जवानांना महागात पडलं असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. गुजरातमधील बडोद्यामध्ये लष्कराच्या तीन जवांनाना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यामुळे या जवानांच्या संपर्कात आलेल्या 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तीनही जवान बडोद्यातील एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार 393 वर पोहचली आहे. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून यानंतर आता गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 5,649 रुग्ण असून गुजरातमधील रुग्णांचा आकडा वाढून संख्या 2,407 वर पोहोचली आहे. देशात बुधवारी एकूण 1,273 कोरोना रुग्ण आढळले. त्यांपैकी 52 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 431 तर गुजरातमध्ये 229 नवे रुग्ण आढळले. 

मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या शहरांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राजस्थानात 153, उत्तर प्रदेशात 101 आणि दिल्लीत 92 नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. बुधवारी देशात कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 31 म्हणजेच 79 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 18  आणि गुजरातमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला. तर, मुंबईत 10 आणि अहमदाबादमध्ये 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रानंतर आता गुजरातचा क्रमांक लागला आहे. महाराष्ट्रात 269 रुग्णांचा, तर गुजरातमध्ये 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू

CoronaVirus: अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली; प्रसाराचा वेग स्थिर

CoronaVirus: मेच्या मध्यात देशातील मृतांचा आकडा ३८ हजारांवर जाणार?

 

Web Title: Coronavirus 3 army personnel corona who withdraw money from same atm baroda SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.