शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: केवळ ग्रीन झोनमधील शहरांसाठीच सुरू होणार देशांतर्गत विमान वाहतूक, केंद्रीय विमान वाहतूकमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 07:45 IST

१७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल.

नवी दिल्ली : लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमान वाहतूक ज्यावेळी उड्डाणाचे आणि उतरण्याचे ठिकाण असलेली दोन्ही शहरे ग्रीन झोनमध्ये वर्ग केलेली असतील, तेव्हाच सुरू केली जाईल, असे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होत असल्याने अनेक शहरांचे झोनमध्ये करण्यात आलेले वर्गीकरणही सतत बदलत असल्याने देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  १७ मेनंतर लॉकडाऊन उठल्यानंतर देशातील व्यापारी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत विमान मंत्रालयाने विविध कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. परंतु हे टप्प्याटप्प्यानेच केले जाईल. सुरुवातीला देशांतर्गत विमान वाहतूक सुरू केली जाईल. पुढच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे पुरी म्हणाले.विमान मंत्रालयाने विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाची ६४ विमाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यात जवळपास १.९ लाख भारतीयांना परत आणले जाणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम असणारआहे.जगभरात साथ सुरू असल्यामुळे सर्वच देशांतील विमान वाहतूक ठप्प आहे. आंतरराष्टÑीय विमान वाहतूकही बंद असून, ती सुरू होण्याबाबत अनिश्चितता आहे. (वृत्तसंस्था)सोशल डिस्टन्सिंगमुळे तिकिटे महागणार?च्विमानात प्रवासी वाहतूक करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबतही सरकार चर्चा करीत आहे. मात्र कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे की, या कारणासाठी विमानात काही सीट्स रिकामे ठेवण्याचा निर्णय घेतला तर यासाठी प्रवाशांकडून अधिक तिकीट आकारावे लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमानIndiaभारत