Coronavirus : ...म्हणून वुहानमध्ये थांबला कोरोनाचा प्रादुर्भाव; चीनहून परतलेल्या जीवशास्त्रज्ञाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 09:17 AM2020-03-22T09:17:29+5:302020-03-22T09:18:17+5:30

चीनच्या वुहानमध्ये या व्हायरसच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचा दावा चिनी सरकारनं केला आहे.

Coronavirus : coranavirus controlled in wuhan due to this biologist returned from china revealed vrd | Coronavirus : ...म्हणून वुहानमध्ये थांबला कोरोनाचा प्रादुर्भाव; चीनहून परतलेल्या जीवशास्त्रज्ञाचा खुलासा

Coronavirus : ...म्हणून वुहानमध्ये थांबला कोरोनाचा प्रादुर्भाव; चीनहून परतलेल्या जीवशास्त्रज्ञाचा खुलासा

Next

कोरोना विषाणूशी लढण्याचं भारतापुढे मोठं आव्हान आहे. केंद्रासह राज्यातील सरकारांनी या समस्येचा सामना करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न चालवले आहेत. विशेष म्हणजे भारतात कोरोना विषाणूबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. चीनच्या वुहानमध्ये या व्हायरसच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आल्याचा दावा चिनी सरकारनं केला आहे. जनतेनं सरकारच्या नियमावलीचे पालन केले तरच या दुर्धर रोगावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.

अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजनाही केल्या पाहिजेत. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या कोरोनावर नियंत्रण न ठेवल्यास, तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात आपल्याला अधिक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चीनच्या वुहान येथून आलेल्या कांग्राचे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ सोमराज यांनी चीननं कशा प्रकारे या रोगावर नियंत्रण मिळवलं आहे, याचा खुलासा केला आहे. सोमराज म्हणाले, प्रत्येकाने शासन व प्रशासनाचे नियम आणि सल्ले पाळले पाहिजेत, तरच कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. वुहानमध्ये 20 जानेवारीला कोरोना विषाणू पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला. तीन दिवसांनंतर चिनी सरकारने 23 जानेवारी रोजी सर्व शहरांना कुलूप ठोकले. त्यानंतर 14 मार्चला वुहानवगळता सर्व शहरे पूर्णपणे उघडली गेली आहेत.

आता 1 एप्रिल रोजी वुहान शहर उघडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कांग्राच्या जवाळी उपविभागाच्या मठालाड पंचायतीच्या सोमराज यांनी सांगितले की, ते गेल्या साडेतीन वर्षांपासून चीनच्या वुहानमधील सरकारी अनुदानित फार्मास्युटिकल कंपनीत सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी सात वर्षे भारतात काम केले आहे.

ते म्हणाले की, ते 27 फेब्रुवारी रोजी वुहान येथून भारतात आले. त्यावेळी 112 लोक त्यांच्याबरोबर आले. त्यापैकी कोणीही कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह नव्हता. दिल्लीतील आयटीबीपी कॅम्पमध्ये 14 दिवसांच्या विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ते आता आपल्या कुटुंबासमवेत घरी राहतात. वुहान शहर उघडल्यानंतर मी पुन्हा कामासाठी तिथे जाणार आहे. तसेच सोमराज हे न्यूमोनिया, टायफॉइडसाठी औषधे तयार करण्याच्या कंपनीत नवीन लस संशोधन व इतर कार्य करतात. 

Web Title: Coronavirus : coranavirus controlled in wuhan due to this biologist returned from china revealed vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.