शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनिलमुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या, कारस्थानामागे ड्रगमाफिया; रामदेव बाबा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 14:44 IST

आम्ही सर्व नियमांचं पालन केलं, कोणतीही चूक केली नाही; रामदेव बाबांचा दावा

हरिद्वार: पतंजलीच्या कोरोनिल औषधामुळे अनेकांना मिरच्या झोंबल्या. त्यामुळेच आमच्याविरोधात देशभरात एफआयआर दाखल झाल्या, अशा शब्दांमध्ये योगगुरू रामदेव बाबांनी त्यांचा संताप व्यक्त केला. कोरोनिलवर टीका करणाऱ्यांवर रामदेव बाबा चांगलेच संतापले. जणू काही आम्ही दहशतवादी आणि देशद्रोही आहोत, अशा प्रकारे आमच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले. २३ जूनला रामदेव बाबांनी आचार्य बाळकृष्ण यांच्यासह पत्रकार परिषद घेत कोरोनिल औषध लॉन्च केलं. या औषधामुळे कोरोना आठवड्याभरात बरा होत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र यामुळे मोठा वाद निर्माण झाला. औषधाच्या चाचण्या, ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेले परवाने यावरून रामदेव बाबा आणि पतंजली वादात सापडले. केंद्र सरकारसोबतच अनेक राज्यांनीदेखील कोरोनिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर पतंजलीनं यू-टर्न घेतला. कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा कधीही केला नव्हता, असं म्हणत कोलांटउडी मारली.कोरोनिलवरून निर्माण झालेल्या वादावर आज रामदेव बाबांनी स्पष्टीकरण दिलं. 'नोंदणीपासून ते चाचण्यांपर्यंत सर्व नियमांचं पालन करण्यात आलं असून आम्ही काहीही गैर केलेलं नाही,' असा दावा रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी त्यांनी कोरोनिलवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. 'पतंजलीनं यू-टर्न घेतल्याचं लोक म्हणतात. आम्ही कोणतंही संशोधन केलं नसल्याचे आरोप करतात. काहींनी थेट माझी जात, धर्म, संन्यास यावरून टीका केली. भारतात आयुर्वेदावर काम करणं म्हणजे जणू काही गुन्हा असल्याचं वातावरण तयार केलं गेलं. आम्हाला आयुर्वेदाच्या माध्यमातून मिळणारं यश पाहून अनेकांना मिरच्या झोंबल्या,' अशा शब्दांत रामदेव बाबा कोरोनिलवर टीका करणाऱ्यांवर बरसले.आम्ही कोरोनिल औषध लॉन्च करताच मोठं वादळ आलं. ड्रग माफियांना धक्का बसला. भारतविरोधी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्या हादरून गेल्या, अशा शब्दांत रामदेव बाबांनी संताप व्यक्त केला. संशोधन करण्याचं काम केवळ टाय घालणारी मंडळी करतात. लंगोट घालणारे लोक केव्हापासून संशोधन करू लागले, असा प्रश्न काहींना पडला. पण संशोधन करण्याचा मक्ता केवळ तुम्हीच घेतला आहे का? ती फक्त मोजक्यांची मक्तेदारी आहे का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न

कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ कुणी 'कोरोनिल' औषध विकताना दिसलं, तर...; 'पतंजली'ला आणखी एका राज्यातून धक्का

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीcorona virusकोरोना वायरस बातम्या