CoronaVirus Patanjali takes U Turn On Coronil After Uttarakhand Ayush Department Notice | CoronaVirus News: आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न

CoronaVirus News: आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न

नवी दिल्ली: कोरोनाच्या उपचारासाठी तयार केलेल्या कोरोनिल औषधावरून आता पतंजलीनं यू-टर्न घेतला आहे. आम्ही कोरोनावरील कोणतंही औषध तयार केलं नसल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटिशीला दिलेल्या उत्तरात पतंजलीनं कोरोनावर कोणतंही औषध तयार केलंच नसल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वीच योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनिल औषधाचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं.

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत रामदेव बाबांनी कोरोनिल लॉन्च केलं. मात्र हे औषधं, त्यासाठी आवश्यक परवाना यावरून रामदेव बाबा अडचणीत सापडले. उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं पतंजलीला नोटीस पाठवली. त्यानंतर रामदेव बाबांनी कोलांटउडी घेतली. 'आम्ही कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केलाच नव्हता. कोरोना रुग्ण बरे होतील, असं औषध तयार केल्याचं आम्ही म्हटलं होतं,' असं स्पष्टीकरण पतंजलीकडून उत्तराखंड सरकारला देण्यात आलं आहे. 

आम्ही कधीही कोरोनावरील औषधं तयार केल्याचा दावा केला नव्हता, असं पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं. आम्ही सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन औषध तयार केलं. त्या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले. आमच्या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होतात, असा दावा आम्ही केला होता. त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. या प्रकरणी उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं दिलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिलं आहे, असं बाळकृष्ण यांनी सांगितलं.

२३ जूनला पतंजली आयुर्वेदनं राजस्थानच्या निम्स विद्यापीठासोबत कोरोनाचं औषध तयार केल्याचा दावा केला. या औषधाला कोरोनिल आणि श्वासारी वटी असं नाव देण्यात आलं. रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण आणि निम्स विद्यापीठाच्या संचालकांच्या उपस्थितीत हरिद्वारमध्ये कोरोनिल लॉन्च करण्यात आलं. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता.

कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ 

कुणी 'कोरोनिल' औषध विकताना दिसलं, तर...; 'पतंजली'ला आणखी एका राज्यातून धक्का

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Patanjali takes U Turn On Coronil After Uttarakhand Ayush Department Notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.