शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाला हरवण्यासाठी केजरीवाल यांचा 5T प्लॅन, अशी होणार अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:33 IST

दिल्लीत आतापर्यंत कोरोनाचा 500 हुन अधिक रुग्ण सापडले आहेत.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार 5T प्लॅनमध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीम वर्क आणि ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग या पाच प्रमुख बाबींचा समावेश

नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक मास्क, पीपीएफ किट यांची मागणी करण्यात आणि असून, 29 हजार पर्यंत रुग्ण आले तरी त्यांच्यावर उपचार करण्यास राज्य सक्षम आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठी 5T प्लॅनची घोषणा केली. 

अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 5T प्लॅनमध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीम वर्क आणि ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग या पाच प्रमुख बाबींचा समावेश आहे. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. केजरीवाल यांनी सांगितलेल्या 5T बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...

टेस्टिंग - दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. दक्षिण कोरियाप्रमाणे दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जातील. यापूर्वी टेस्टिंग किटची समस्या होती. मात्र आता किट उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात रॅपिड टेस्ट घेतल्या जातील, असे केजरीवाल यांनी सांगितले. 

ट्रेसिंग - तसेच दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्यात  येत आहे. आशा व्यक्तींना सेल्फ क्वारेन्टीन करण्यात येत आई. त्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. 

ट्रीटमेंट - दिल्लीत आतापर्यंत 525 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांसाठी 3 हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.  टीम वर्क - कोरोनाच्या आपत्तीवर एकट्या दुकाट्याने मात करता येणार नाही. त्यामुळे   सर्वांना एक टीम म्हणून काम करावे लागेल. आज सर्व राज्य सरकारे आणि विभागांना एक टीम म्हणून काम करावे लागेल. तसेच लॉकडाऊनचे सर्वांनी पालन करावे लागेल.  ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग - आपल्याला सर्व गोष्टी ट्रॅक कराव्या लागतील. सर्व प्लॅन ट्रॅक करण्याची जबाबदारी माझी आहे. जात आपण कोरोनापेक्षा तीन पावले पुढे राहिलो तरच आपण त्याला हरवू शकू.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली