CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:06 AM2021-05-10T06:06:06+5:302021-05-10T06:11:10+5:30

मृत्यूचा दर १.०९ टक्के आहे. देशात सात ऑगस्ट, २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती तर या महिन्यात ४ तारखेला तिने २ कोटींचा टप्पा ओलांडला. ८ मे रोजी १८ लाख ६५ हजार ४२८ नमुन्यांची तपासणी केली गेली.

CoronaVirus: 4.03 lakh new corona patients in the country; 4,092 deaths | CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू

CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू

Next

नवी दिल्ली : भारतात रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ४ लाख ३ हजार ७३८ नवे रुग्ण नोंद झाले, तर ४ हजार ९२ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंची संख्या २ लाख ४२ हजार ३६२ तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी २२ लाख ९६ हजार ४१४ झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ३७ लाख ३६ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण १६.७६ टक्के आहे. कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी ही ८२.१५ आहे. आतापर्यंत १ कोटी ८३ लाख १७ हजार ४०४ कोरोना रुग्ण तर २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४४४ जण बरे झाले. 

मृत्यूचा दर १.०९ टक्के आहे. देशात सात ऑगस्ट, २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाख होती तर या महिन्यात ४ तारखेला तिने २ कोटींचा टप्पा ओलांडला. ८ मे रोजी १८ लाख ६५ हजार ४२८ नमुन्यांची तपासणी केली गेली.

मृत्युमुखी पडलेल्यांची राज्यनिहाय संख्या 
nमहाराष्ट्र- ८६४, कर्नाटक- ४८२, दिल्ली - ३३२, उत्तर प्रदेश- २९७, तामिळनाडू- २४१, छत्तीसगड- २२३, पंजाब- १७१, राजस्थान- १६०, हरयाणा- १५५, झारखंड- १४१, पश्चिम बंगाल- १२७, गुजरात- ११९, उत्तराखंड-११८.
 

Web Title: CoronaVirus: 4.03 lakh new corona patients in the country; 4,092 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.