शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

3 कोटी लोकांना भारतात पहिल्या टप्प्यात देणार कोरोनाची लस, डॉक्टर, आरोग्यसेवकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 07:00 IST

केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आखत आहे.

नवी दिल्ली : कोरोना लस विकसित झाल्यानंतर देशात सर्वप्रथम ती तीन कोटी लोकांना देण्यात येणार असून, त्यामध्ये डॉक्टर, आरोग्यसेवकांचा समावेश असेल. ही लस टप्प्याटप्प्याने इतर लोकांनाही देण्यात येईल. त्यासाठीचे धोरण केंद्र सरकारने नेमलेली तज्ज्ञ समिती तयार करत आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना कोरोना लस देण्यात येईल, त्यामध्ये सुमारे १ कोटी डॉक्टर व दोन कोटींपेक्षा अधिक आरोग्यसेवकांचा समावेश असेल. 

केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आखत आहे. त्यामध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, परराष्ट्र व्यवहार यासह विविध खात्यांचे प्रतिनिधी, आयसीएमआर आदी संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

व्याधिग्रस्तांना प्राधान्य५० वर्षे वयावरील तसेच त्यापेक्षा कमी,  पण एकाहून अधिक व्याधींनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनाही पहिल्या टप्प्यातच कोरोनाची लस दिली जाईल. ज्या आरोग्यसेवकांना कोरोना लस द्यायची आहे, त्यांच्या नावाच्या यादीचे काम चालू महिन्यात वा नोव्हेंबरच्या सुरुवातीला पूर्ण होईल. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंdoctorडॉक्टर