शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारताची वॉर्म व्हॅक्सिन प्रभावी ठरणार, १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 11:51 PM

Warm Vaccine : कोरोना विषाणूचे काही व्हेरिएंट्स लसीलाही दाद देईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत लस संशोधन करणाऱ्या जगतातून एक खूशखबर आली आहे

बंगळुरू - गेल्या दीड वर्षापासून धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जात आहे. मात्र कोरोना विषाणूचे काही व्हेरिएंट्स लसीलाही दाद देईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत लस संशोधन करणाऱ्या जगतातून एक खूशखबर आली आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स आणि बायोटेक कंपनी मिनव्हॅक्सकडून विकसित करण्यात आलेली वॉर्म व्हॅक्सिन कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिएंटविरोधात शरीरामध्ये अँटीबॉडी विकसित करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. ही लस ९० मिनिटांपर्यंत १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहू शकत असल्याने तिला वॉर्म व्हॅक्सिन असे म्हटले जात आहे. तसेच ही लस ३७ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये स्थिर राहू शकते. (India's worm vaccine will be effective on all variants of corona, safe even at 100 degree)

ही लस इतर लसींपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कारण इतर लसी ह्या खूप कमी तापमानामध्ये साठवाव्या लागतात. ही बाब ऑस्ट्रेलियाच्या CSIRO कडून या लसीच्या स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या विश्लेषणात नमूद करण्यात आली आहे.  याबाबत डिटेल्स एसीएस इंफेक्शियस डिजीजेज जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार उंदीर आणि हॅमस्टरमध्ये या लसीमुळे विषाणूंविरोधात जबरदस्त इम्युन सिस्टिम विकसित झाला. ही लस कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटिनच्या एका भागात करण्यात आलेल्या बदलाच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.

बायोटेक फर्म मायनव्हॅक्ससोबत संयुक्तपणे काम करत अशलेल्या भारतीय विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी वॉर्म व्हॅक्सिन फॉर्मुलेशनची निर्मिती केली आहे. प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासामध्स समोर आलेल्या माहितीनुसार ही लस कोरोनाच्या सर्व चिंताजनक व्हेरिएंट (अल्फा, बीटा, कप्पा, डेल्टा) या सर्वांविरोधात प्रभावी आहे. एसीएस इंफेक्शियस डिजीज जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या या रिसर्चमधून या वॉर्म व्हॅक्सिनच्या फॉर्म्युल्यामुळे उंदरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. 

हे फॉर्म्युलेशन ३७ डिग्री सेंटिग्रेड तापमानामध्ये एका महिन्यापर्यंत स्थायी राहू शकते. तसेच १०० डिग्री तापमानामध्ये ९० मिनिटांपर्यंत राहू शकते. त्यामुळेच या फॉर्म्युलेशनला वॉर्म व्हॅक्सिन असे नाव देण्यात आले आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्यIndiaभारत