शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 06:42 IST

दररोज सरासरी ३५ लाख डोस

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सरकारने हाती घेउन एक महिना झाला आहे. मात्र, दररोज १ कोटी डोस देण्याचे लक्ष्य सरकारला अद्याप गाठता आलेले नाही. सरकारला एका दिवसात ८६ लाख डोस देण्याचा उच्चांक गाठल्यानंतर सातत्याने दैनंदिन आकडा घटत आला आहे.

केंद्र सरकारने २१ जूनला लसीकरणाची सुत्रे हाती घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ८६ लाख डोस देण्यात आले होते. सरकारने दररोज १ कोटी डोस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, ते अद्याप सरकारला गाठता आलेले नाही. सद्यस्थितीत लसीकरणाची गती दररोज ४० ते ५० लाख डोस एवढी आहे. तर शनिवार आणि रविवारी हे प्रमाण १२ ते १४ लाखांपर्यंत घटल्याचे दिसून येत आहे.

जुलैमध्ये गती मंदावली

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनंतर पहिल्या आठवड्यात दररोज सरासरी ५८ लाख डोस देण्यात आले. त्यानंतरच्या आठवड्यात हे प्रमाण सरासरी ४० लाख डोसपर्यंत घटले. तर जुलैमध्येही हे प्रमाण दररोज सरासरी ३५ लाख डोसपर्यंत राहिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गतीत किंचित वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, ग्रामीण भागात पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अपेक्षित लक्ष्य गाठता आलेले नाही. सरकारने ६६ कोटी डोसची आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. मात्र, हा साठा सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

२४ दिवसांमध्ये ३० ते ४० कोटींचा टप्पआतापर्यंत देशात ४१ कोटी डोस देण्यात आले आहेत. १० कोटी डोसचा टप्पा ८५ दिवसांमध्ये गाठला होता. तर ३० ते ४० कोटी डोसचा टप्पा केवळ २४ दिवसांमध्येच गाठला आहे.

देशात कोरोनाचे ३०,०९३ नवे रुग्ण

- देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०,०९३ नवे रुग्ण नोंद झाले, तर ३७४ जणांचा मृत्यू झाला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या १२५ दिवसांतील ही सगळ्यात कमी रुग्णसंख्या आहे. 

- देशात आतापर्यंत ४,१४,४८२ जणांचा मृत्यू झाला असून, गेल्या १११ दिवसांत सर्वांत कमी मृत्यू झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,०६,१३० असून, तीदेखील गेल्या ११७ दिवसांतील सर्वांत कमी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.३० टक्के, तर बरे होण्याचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे. 

- गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांच्या संख्येत १५,५३५ ची घट झाली आहे. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ४१.१८ कोटी लोकांना कोरोना विषाणूवरील लस दिली गेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार