शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

लसीकरण मोहीम शनिवारी मोदींच्या हस्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 5:29 AM

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार कार्यक्रम

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम भारत राबविणार आहे, असे मोदी यांनी नुकतेच सांगितले होते.

सीरम इन्स्टिट्यूटने मंगळवारी पुण्याहून देशातील विविध ठिकाणांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. सध्या कोरोना लसीच्या ५४.७२ लाख डोसचा साठा केंद्र सरकारकडे असून, गुरुवारपर्यंत या डोसची संख्या १.६५ कोटीपर्यंत जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यातील १ कोटी १० लाख डोस सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’चे तर ५५ लाख डोस भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीचे असणार आहेत. केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, कोवॅक्सिन, कोविशिल्डप्रमाणेच देशात आणखी काही कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. त्यांच्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आल्यानंतर केंद्र सरकार त्या लसींबाबत काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षणnकोरोना चाचणीच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्यसेवक व कोरोना योद्धा यांच्यासह ३ कोटी लोकांना प्राधान्याने लस देण्यात येईल. nत्यानंतर ५० वर्षे वयावरील व ५० वर्षे वयाखालील व्याधीग्रस्त लोकांना ही कोरोनाची लस दिली जाईल. लसीकरणासाठी काही हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. nदेशातील प्रत्येक राज्यात, केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरण केंद्रे उभारली जातील.

देशात 16 हजारांहून कमी नवे रुग्ण

उपचाराधीन २.१४ टक्के; बरे झाले १ कोटी १ लाख

नवी दिल्ली : देशात दररोज आढळणारे नवे रुग्ण तसेच उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट सुरूच आहे. बुधवारी १५९६८ नवे रुग्ण आढळून आले. उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी होती व त्यांचे प्रमाण २.१४ टक्क्यांपर्यंत घटले आहे. १ कोटी १ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.५१ टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०४९५१४७ असून त्यातील १०१२९१११ जण बरे झाले आहेत, तर २१४५०७ जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक म्हणजे, १७८१७ एवढी होती. या दिवशी कोरोनामुळे आणखी २०२ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १५१५२९ एवढी झाली  आहे.जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९ कोटी २० लाख असून, त्यातील ६ कोटी ५९ लाख लोक बरे झाले आहेत. २ कोटी ४१ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत २ कोटी ३३ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १ कोटी ३८ लाख रुग्ण बरे झाले, तर ९१ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी