सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; अयोध्येवरील पुस्तकावरून वाद पेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 05:45 PM2021-11-15T17:45:29+5:302021-11-15T17:46:47+5:30

Controversy erupted over a book on Ayodhya : माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे आपले ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वादात आहेत. सलमान खर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे.

Controversy erupted over a book on Ayodhya Arson stone pelting at salman khurshid house in Nainital  | सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; अयोध्येवरील पुस्तकावरून वाद पेटला

सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; अयोध्येवरील पुस्तकावरून वाद पेटला

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते (Salman Khurshid) यांच्या नैनीताल येथील घरावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील माहिती स्वतःहा काँग्रेस नेत्यानेच फेसबूकवरून दिली आहे. एवढेच नाही, तर हल्ला करणाऱ्यांच्या हातात भाजपचा झेंडा होता आणि ते सांप्रदायिक घोषणाबाजी करत होते, असेही बोलले जात आहे. (Controversy erupted over a Salman Khurshid book on Ayodhya)

माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे आपले ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून वादात आहेत. सलमान खर्शीद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटना ISIS आणि बोको हरामसोबत केली आहे आणि हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

फेसबूकवर घटनेचे फोटो शेअर करत सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे, हे हिंदुत्व असू शकत नाही, असे म्हणणारा मी अजूनही चूक आहे का? 

यापूर्वी शाहजहांपूर येथे शनिवारी विहिंपने (VHP) सलमान खुर्शीद यांचा पुतळा जाळला होता. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेने खुर्शीद यांची जीभ कापण्याची धमकीही दिली होती. यावेळी, अशा लोकांना पाकिस्तानात पाठवायला हवे, असेही VHP कार्यकर्त्यांनी म्हटले होते.
 

Web Title: Controversy erupted over a book on Ayodhya Arson stone pelting at salman khurshid house in Nainital 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.